एक SMS आणि, रॉकेल भेसळ थांबणार...

रॉकेलचा काळाबाजार करण्याऱ्यांची दहशत आणि काळे धंद्याचे साम्राज्य हे वाढत चालले आहेत. हा काळाबाजार रोखण्यासाठी आता कडक पावले उचलली जात आहे.

Updated: Mar 29, 2012, 06:29 PM IST

www.24taas.com, कोल्हापूर

 

रॉकेलचा काळाबाजार करण्याऱ्यांची दहशत आणि काळे धंद्याचे साम्राज्य हे वाढत चालले आहेत. हा काळाबाजार रोखण्यासाठी आता कडक पावले उचलली जात आहे. नव्या तंत्रज्ञानानुसार रॉकेलच्या टॅकंरने दिशा बदलल्यास आता एसमेसद्वारे माहिती मिळून त्याद्वारे आता लगेचच कारवाई होणार आहे.

 

सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तू रास्त दरात मिळण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत पुरवल्या जातात. मात्र वितरक आणि ग्राहक यांच्यापर्यंत ती वस्तू पोहोचण्या अगोदर त्या काळ्याबाजारासाठी गायब होण्याचे प्रकार वारंवार घडतात. हे प्रकार रोखण्यात सरकारी हतबलता दिसत असतानाचं कोल्हापूरच्या जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यानी मात्र यावर मार्ग काढला आहे. रॉकेल घेऊन जाणारा टॅंकर निघाला कि तो संगणकावर दिसेल.

 

यासाठी एक डिव्हाईस आणि गुगल याची मदत घेण्यात आली आहे. रॉकेलचा टॅंकर योग्य मार्गाने जातो आहे का? तो वाटेत कुठे थांबला ही आणि अशी सर्वच माहिती एसमेसवर मिळत जाणार आहे. आणि गरजेपेक्षा जास्त वेळ थांबल्याचे कळल्यास एका एसमेसद्वारे  तो टॅंकर जागेवरच थांबवण्यात येणार आहे. या अगोदरही जिल्हा प्रशासनानं असाच प्रयोग केला होता. आता मात्र इलेक्ट्रोनिक डिव्हाईसच्या माध्यमातून हा प्रयोग यशस्वी होईल असे दावे करण्यात येत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भेसळखोरांना चाप बसणार आहे.