पिंपरीत टँकर माफिया सक्रिय

पाणी टंचाईची गंभीर समस्या भेडसावत असतानाच लोकांच्या असहाय्यतेचा फायदा उचलत पिंपरीत टँकर माफिया सक्रिय झालाय. राष्ट्रवादी कॉंग्रेसचंच या माफियाला अभय असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मात्र टॅन्कर माफियांकडून होत असलेल्या लुटीमुळे नागरिक हैराण झालेत.

Updated: Apr 26, 2012, 10:51 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पाणी टंचाईची गंभीर समस्या भेडसावत असतानाच लोकांच्या असहाय्यतेचा फायदा उचलत पिंपरीत टँकर माफिया सक्रिय झालाय. राष्ट्रवादी कॉंग्रेसचंच या माफियाला अभय असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मात्र टँकर माफियांकडून होत  असलेल्या  लुटीमुळे नागरिक हैराण झालेत.

 

पिंपरी चिंचवडच्या सांगवी आणि पिंपळे  गुरव  परिसरात  सध्या  भीषण पाणी टंचाई आहे. या भागात महापालिका टॅन्करनं पाणी पुरवठा करतेय. मात्र याच भागात टॅन्कर माफियाही सक्रीय झालाय. महापालिकेचं पाणी वेळेवर येत नाही. आणि टॅन्करनं पाणी मागितलं  तर साडे तीनशे रुपयाचा टॅन्कर जवळपास हजारहून अधिक रुपयांना पुरवला जातोय. आधीच असह्य उन्हाळा आणि त्यात टॅन्कर माफियाचा हा हैदोस यामुळे पिंपरी-चिंचवडची जनता  चांगलीच हैराण झालीय. त्यामुळे पालिका नेमकं करतेय तरी  काय असा सवाल नागरिक करत आहेत. पिंपरी-चिंचवडच्या सांगावी परिसरातच टॅन्कर  माफिया  सर्वाधिक  सक्रीय आहे आणि त्याला  स्थानिक  नेत्यांचाच आधार  असल्याचा आरोप करत शिवसेनेनं आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर तोफ डागलीय.

 

दूसरीकड आमदार लक्ष्मण जगताप यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळलेत. काहीही असलं तरी राजरोसपणे सुरु असलेली ही टॅन्कर माफियाची  लूट कुणाच्या वरद  हस्ताशिवाय शक्य नाही हे उघड सत्य आहे.. पण असं असतानाही आंधळं बनण्याची सवय लागलेले सत्ताधारी मात्र अजूनही आंधळेच बनून आहेत आणि जनता मात्र त्याचा नाहक त्रास सहन करतेय...