मांढरदेवीचा सोन्याचा मुखवटा चोरीला

साताऱ्यातील मांढरदेवीचा सोन्याचा मुखवटा आणि चांदीचा मुकूट चोरीला गेल्याची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.

Updated: Dec 6, 2011, 06:33 PM IST

झी २४ तास वेब टीम, सातारा

 

साताऱ्यातील मांढरदेवीचा सोन्याचा मुखवटा आणि चांदीचा मुकूट चोरीला गेल्याची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. देवीच्या मुखवट्यासह मंदिराच्या गाभाऱ्यातील चांदीच्या पादुका, चांदीचे तबक, महादेवाची पिंडीसह एकूण 11 किलो चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत. हे दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

 

मांढरदेवीच्या मंदिरातच अशा प्रकारे चोरट्यांनी दागिने पळवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. देवीचा मुखवटा चोरीला गेल्याने येथील स्थानिक नागरिक मात्र चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांमुळे आता चोरांना लवकरात लवकर जेरबंद केलं जावं ही मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.