शिर्डी साईबाबा संस्थानच्या उत्पन्नात २१% वाढ

साईंच्या चरणी अर्पण होणाऱ्या दानाची रक्कम दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील वर्षी ४०१ कोटी रूपये साई चरणी अर्पण करण्यात आले. २०१० मध्ये हा आकडा ३२२ कोटी इतका होता.

Updated: Feb 10, 2012, 10:18 AM IST

प्रशांत शर्मा,  www.24taas.com, शिर्डी

 

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी साईंच्या चरणी ८१ कोटींचं दान आणि ३६ किलो सोनं अर्पण करण्यात आलं आहे.

 

साईंच्या चरणी अर्पण होणाऱ्या दानाची रक्कम दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील वर्षी ४०१ कोटी रूपये साई चरणी अर्पण करण्यात आले. २०१० मध्ये हा आकडा ३२२ कोटी इतका होता. मागील वर्षी साईंच्या चरणी ३६ किलो सोनं अर्पण करण्यात आलं होतं. २०१० मध्ये हा आकडा ३१ किलो इतका होता. तर भक्तांनी तब्बल ४४० किलो चांदी साईंच्या चरणी अर्पण केली आहे.

 

साईबाबांना आतापर्यंत अनेक सोन्याचे मुकुट आणि हार अर्पण केले आहेत. शंभर किलोचं सोन्याचं सिंहासनही भक्तांनी अर्पण केलं आहे. याशिवाय चेन्नईचे साईभक्त के.व्ही.रमणी यांनी संस्थानला दिलेल्या १२५ कोटी रूपयांतून भक्त निवासाची उभारणी केली जात आहे.