मुंबई मॅरेथॉन उत्साहात संपन्न

मुंबई मॅरेथॉनममध्ये केनियन धावपटूंचवं वर्चस्व दिसून आलं. केनियाच्या लबान मोईबेननं नववी मुंबई मॅरेथॉन जिंकली. त्यानं 2 तास 10 मिनिटं आणि 48 सेकंदांची वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. तर इथिओपियाच्या राजी असाफानही 2 तास 10 मिनिटं आणि 48 सेकंदांची वेळ नोदंवली. मात्र, काही सेंकंदांच्या फरकानं मोईबेननं बाजी मारली.

Updated: Jan 15, 2012, 04:13 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई मॅरेथॉनममध्ये केनियन धावपटूंचवं वर्चस्व दिसून आलं. केनियाच्या लबान मोईबेननं नववी मुंबई मॅरेथॉन जिंकली. त्यानं 2 तास 10 मिनिटं आणि 48 सेकंदांची वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. तर इथिओपियाच्या राजी असाफानही 2 तास 10 मिनिटं आणि 48 सेकंदांची वेळ नोदंवली. मात्र, काही सेंकंदांच्या फरकानं मोईबेननं बाजी मारली. आणि असेफाला दुस-या क्रमांकावर सामाधान मानाव लागलं. केनियाचाच जॉन क्युई 2 तास 10 मिनिटं आणि 54 सेंकंदांची वेळ नोंदवून तिस-या स्थानावर आला.

 

मुंबई मॅरेथ़नमध्ये भारताकडून इंडियन आर्मीच्या रामसिंग यादवनं बाजी मारली. त्यानं 2 तास 16 मिनिटं आणि 59 सेकंदांची वेळ नोंदवली. तर ईलाम सिंगनं 2 तास 18 मिनिटं मि 27 सेंक्दांची वेळ नोंदवत दुसरा क्रमांक पटकावला. राजेश टी-.ए.नं 2 तास 24 मिनिंटं आणि 25 सेंकदामध्ये मॅरेथॉन पुर्ण करत तिस-या स्थानावर आला. रामसिंगनं अव्वल क्रमांक पटकावत लंडन ऑलिंपिकसाठीचा ब पात्रता निकषही पूर्ण केला आहे.

 

मुंबईतल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत पुरूष गटात सोजी मॅथ्थ्युजनं बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला. तर महिलांमधून प्रियंका सिंग पटेलनं बाजी मारली. सोजीने 1तास पाच मिनिटे आणि 29 सेकंदांमध्ये हे अंतर पार केलं. तर प्रियंकासिंगने एक तास 21 मिनिटे 31 सेकंदात अंतर पार केलं. पुरुषांमध्ये आशीष सिंगने दुस-या तर मानसिंगने तिसरा येण्याचा बहुमान मिळवला. दुसरीक़डे महिलांमध्ये विजयमाला पाटील ही दुसरी तर सुप्रिया पाटील तिसरी आली.

 

मुंबईत धावपटूंच्या प्रचंड उत्साहात नववी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देशी तसच परदेशी खेळाडु मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यात २३३ परदेशी धावपट्टुंसह २७०८ धावपट्टू सहभागी झाले. फुल स्पर्धेत पुन्हा एकदा केनियानं वरचष्मा कायम ठेवला. केनियाच्या लबान मोईबेनची फुल मॅरेथॉनमध्ये सरशी झाली, हाफ मॅरेथॉनमध्ये सोजी मॅथ्थ्युजनं तर महिला गटातून प्रियंकासिंग पटेल विजयी झाली. भारताच्या गटातून रामसिंग यादव अजिंक्य ठरला. गुलाबी  थंडीत हजारो मुंबईकरांनी  मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटीज या स्पर्धेत  सहभागी झालेत.. प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानीसुद्धा दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेत सहभागी झालेत. वांद्र्यापासून सुरु झालेल्या हाफ मॅरेथॉनमध्ये ते सहभागी झालेत... याशीवाय अनिल कपूर, गुलशन ग्रोवर, रणबीर कपूर, शबाना आझमी यांनीही स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी हजेरी लावली...