ऑस्ट्रेलिया उभारणार धावांचा डोंगर

सिडनीतील दुसऱ्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाने चांगली पकड निर्माण केली आहे. केवळ तीन विकेट गमावून ३०७ रन्स केल्या आहेत.

Updated: Jan 4, 2012, 01:24 PM IST

www.24taas.com, सिडनी

 

सिडनीतील दुसऱ्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाने चांगली पकड निर्माण केली आहे. केवळ तीन विकेट गमावून ३०७ रन्स केल्या आहेत.

 

कर्णधार मायकल क्लार्क आणि रिकी पाँटींग यांनी झळकाविलेल्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारतावर आघाडी घेतली. यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचे दुसऱ्या कसोटी सामन्यावरही वर्चस्व निर्माण झाले आहे. पाँटींगने कसोटी कारकिर्दीतील ४० वे शतक पूर्ण केले. तर क्लार्कने १८ वे शतक पूर्ण केले.

 

पाँटिंग ३४ डाव आणि दोन वर्षांनंतर कसोटीत शतक करता आले आहे. सिडनीत  ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटींगने सहावे शतक झळकावले आहे. १५० बॉल्समध्ये १०० रन्स केल्या. याआधी   मायकेलने शतक ठोकल होतं.  रिकी पाँटींग १२७ , मायकल क्लार्क १४४ रन्सवर दोघे खेळत आहे.

 

टीम इंडियाच्या आघाडीच्या बॅट्समननी पुन्हा एकदा निराशा केली असताना ऑस्ट्रेलियाने आपली पडझड सावरत  दुसऱ्या दिवशी चांगली सुरूवात केली आहे. केवळ तीन विकेट गमावून ३०७ रन्सचा टप्पा गाठला आहे.

 

पहिल्या दिवसात बॉलरसनी कमाल केली. परंतु ऑस्ट्रेलिया संघातील बॅट्समनी चांगली  कामगिरी करताना २५१ रन्स केल्या आहेत.  मायकेलने आणि रिकी पॉंटींग या जोडीने शतकी भागीदारी केली. ही जोडी टीम इंडियाच्या बॉलर्सची डोकेदुखी झाली आहे.

 

मेलबर्न टेस्टमध्ये याच बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळे भारताला  लाजिरवाणा पराभव सहन करावा लागला होता. विजयाची संधी असूनही बॅट्समनच्या हाराकिरीमुळे भारतानं मेलबर्न टेस्ट गमावली. आणि सिडनी टेस्टमध्येही तेच चित्र दिसून आलं. महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकरचा अपवाद वगळता एकाही बॅट्समननी पिचवर उभं राहण्याचा प्रयत्न केला नाही.

 

ऑस्ट्रेलिया 307/3 (75.2 ov)

टीम इंडिया (पहिला डाव) - 191