झहीरने साधला ‘अर्जुनचा’ नेम

भारताचा आघाडीचा गोलंदाज झहीर खान याला सोमवारी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दिल्लीत केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांच्या हस्ते त्याने हा पुरस्कार स्वीकारला.

Updated: Oct 4, 2011, 11:44 AM IST

झी 24 तास वेब टीम, मुंबई

 

भारताचा आघाडीचा गोलंदाज झहीर खान याला सोमवारी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दिल्लीत केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांच्या हस्ते त्याने हा पुरस्कार स्वीकारला. २९ ऑगस्टला, म्हणजेच भारतीय क्रीडादिनी झालेल्या कार्यक्रमात झहीर ‘अर्जुन’ पुरस्कार स्वीकारू शकला नव्हता.

 

[caption id="attachment_1675" align="alignleft" width="300" caption="झहीर खान ठरला 'अर्जुन' पुरस्काराचा मानकरी"][/caption]

 

इंग्लंड दौऱ्यावर असताना झहीरला दुखापत झाली होती. त्यामुळे गेले काही दिवस तो क्रिकेटपासून दूरच आहे. झहीर खान घोट्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी फार मेहनत घेत आहे. मात्र पूर्णपणे फिट होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल असं झहीरने म्हटलं आहे.

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी पुनरागमन करायचं हे अद्याप निश्चित केलं नसलं तरी लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीत जाण्यास आपण उत्सुक असल्याचं त्याने सांगितलं. तसंच अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यानं समाधानही व्यक्त केलं आहे.