नुपूरच्या तालावर क्रिकेटपट्टू फिदा

बॉलिवूड कलाकार आणि मॉडेल नुपूर मेहताने सेंट्रल लंडनमधील एका कॅसिनोत क्रिकेटपट्टूंना भेटल्याची कबूली दिली आहे पण बुकीजसाठी मॅच फिक्सिंगमध्ये कोणतीही भूमिका बजावल्याविषयी इन्कार केला आहे.

Updated: Mar 19, 2012, 07:02 PM IST

www.24taas.com, लंडन

 

बॉलिवूड कलाकार आणि मॉडेल नुपूर मेहताने सेंट्रल लंडनमधील एका कॅसिनोत क्रिकेटपट्टूंना भेटल्याची कबूली दिली आहे पण बुकीजसाठी मॅच फिक्सिंगमध्ये कोणतीही भूमिका बजावल्याविषयी इन्कार केला आहे.

 

द संडे टाईम्स या वर्तमानपत्राने इंडियन बुकीजनी क्रिकेटपट्टूंना आमिष दाखवण्यासाठी नुपूर मेहताचा उपयोग केल्याचा दावा केला होता. संडे टाईम्सने जरी नुपूर मेहताचा नावासह उल्लेख केल नव्हता तरी मेहताने तो संदर्भ आपल्याशी संबंधित आहे असं वाटल्याने पत्रकार परिषद बोलावून बेटिंग प्रकरणाती सहभागी नसल्याचं सांगितलं. पत्रकार परिषद संपल्यानंतर द संडे टाईम्सशी बोलताना नुपूर म्हणाली की २२ जून २००९ रोजी निव्वळ योगायोगाने ती क्रिकेटपट्टू असलेल्या कॅसिनोत गेली होती.आपण त्यापैकी कुणालाही ओळखत नसल्याचंही तिने सांगितलं. क्रिकेटपट्टु टी २० वर्ल्ड कपसाठी लंडनला आले होते.

 

लंडनच्या वास्तव्यात ती बांधकाम उद्योगात असलेल्या एका व्यवसायिकाबरोब हॉटेलमध्ये राहत होती. संडे टाईम्सने दावा केला आहे की तो एक इंडियन बुकी होता. श्रीलंकन संघाने इंडियन क्रिकेट काऊन्सिलकडे या माणसाविषयी तक्रार केली असल्याने त्याचा उल्लेख टाईम्सला कायदेशीर कारणासाठी करता येत नाही. या इंडियन बुकीने २२ जून २००९ च्या रात्री कॅसिनोमध्ये तीन श्रीलंकन खेळाडूंना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

 

नुपूरला या माणसाशी असलेल्या संबंधाविषयी विचारला असता ती म्हणाली की तो बुकी असल्याची तिला कल्पना नव्हती आणि तो एक बिझनेसमन असल्याचंच आपल्याल माहित होतं. आणि आता या माणसाबरोबर आपले कोणतेही संबंध नसल्याचं तिने सांगितलं. त्यावेळेस हा इसम बांधकाम उद्योगात होता आणि तो बुकी असल्याचं आपल्याला माहित नव्हतं असा दावा तिने केला आहे.

 

आपण अनेक भारतीय क्रिकेटपट्टूंना भेटलो असल्याचं ती म्हणाली. मला क्रिकेट आवडतं आणि क्रिकेटपट्टूंची भेट घेण्यात वावगं काय आहे असं बिचाऱ्या निरागस नुपूरचा सवाल आहे.  आयसीसीच्या तपास पथकाशी आपण बोलण्यास तयार असल्याचंही नुपूर म्हणाली आहे.