बॉलीवूड नटी नुपूर मेहता मॅच फिक्सिंगमध्ये?

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील वर्ल्ड कपची सेमी फायनल मॅच फिक्स असल्याचा दावा लंडनच्या संडे टाईम्स या वृत्तपत्रानं केला होता. या वृत्तपत्रानं एका बॉलीवूड अभिनेत्रीचा फोटोही छापला होता. हा फोटो नुपूर मेहता या अभिनेत्रीचा असल्याचं उघड झालं आहे.

Updated: Mar 12, 2012, 11:19 PM IST

www.24taas.com, लंडन

 

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील वर्ल्ड कपची सेमी फायनल मॅच फिक्स असल्याचा दावा लंडनच्या संडे टाईम्स या वृत्तपत्रानं केला होता. या वृत्तपत्रानं एका बॉलीवूड अभिनेत्रीचा फोटोही छापला होता. हा फोटो नुपूर मेहता या अभिनेत्रीचा असल्याचं उघड झालं आहे. झी २४ तासने नुपूर मेहताशी संपर्क साधला असता तिने हे आरोप फेटाळले आहेत.

 

२०११ वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सेमी फायनलची मॅच फिक्स असल्याचा दावा लंडनच्या संडे टाईम्स या वृत्तपत्रानं केला होता. यामध्ये एका बॉलूवूडच्या अभिनेत्रीचं नाव असल्याचीही शक्यता वर्तविण्यात येते होती. त्यामुळे फिक्सिंगमध्ये वापर करण्यात आलेल्या ती अभिनेत्री कोण ? याबाबत क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा रंगली होती. पण आज संडे टाईम्सने या फिक्सिंगसंबंधी नुपूर मेहता हिचा फोटो छापल्याने आज क्रिकेटविश्वात एकच खळबळ माजली आहे.

 

पुन्हा एकदा फिक्सिंगचं बॉलीवूड कनेक्शनसमोर आलं आहे. यापूर्वीही फिक्सिंगचा इतिहास पाहिला तर यामध्ये बॉलीवूडचं कनेक्शन वेळोवेळी दिसून आलं आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरण धुरळा बसत असतानाचं  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील २०११ वर्ल्ड कप सेमी फायनल फिक्स असल्याचा दावा लंडनच्या संडे टाईम्स या वृत्तपत्रानं केला. त्यातच फिक्सिंग करण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्रीचा वापर करण्यात आल्याचा दावाही या वृत्तपत्रानं केलाहोता.

 

दिल्लीचा सट्टेबाज असलेल्या विकी सेठनं यामध्ये बॉलीवूडच्या अभिनेत्रीचा वापर करण्यात आला असल्याचं सांगितंल आहे. मात्र ती अभिनेत्री कोण याबाबत मात्र कोणताच खुलासा केलेला नव्हता.  त्यामुळे ती अभिनेत्री कोण या बाबत अनेकं तर्क-वितर्क लावले जात होते. दरम्यान, स्पॉट फिक्सिंगमध्ये सध्या तुंरुंगवास भोगत असलेल्या मोहम्मद आसिफची माजी गर्लफ्रेंड वीणा मलिकनही फिक्सिंगचे आरोप करत एकच खळबळ माजवली होती.