भज्जी होऊ शकतो टीम इंडियाचा कॅप्टन- गांगुली

हरभजन सिंग जरी भारतीय टीममधून सध्या बाहेर असला, तरी भविष्यात भारतीय टीमचा कॅप्टन होण्याची त्याच्यात क्षमता असल्याचं मत भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली याने मांडलं आहे.

Updated: Apr 6, 2012, 08:46 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

हरभजन सिंग जरी भारतीय टीममधून सध्या बाहेर असला, तरी भविष्यात भारतीय टीमचा कॅप्टन होण्याची त्याच्यात क्षमता असल्याचं मत भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली याने मांडलं आहे.

 

सौरव गांगुली सधअया पुणे वॉरियर्सचा कॅप्टन आहे, तर हरभजन सिंग मुंबई इंडियन्सचा. आगामी मुंबई इंडियन्स विरुद्ध पुणे वॉरियर्स अशा रंगणाऱ्या सामन्यात दोघेही एकमेकांविरुद्ध उभे असतील. या मॅचपूर्वी बोलताना गांगुली म्हणाला, हरभजनने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध खूप चांगली कॅप्टनसी केली. हरभजनमध्ये भविष्यात टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे.

 

सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबद्दल विचारलं असताना, हा सचिनचा व्यक्तिगत निर्णय आहे असं गांगुली म्हणाला. सचिन यापूर्वीही कर्णधारपद संभाळण्याबाबत उत्सुक नसल्याचं दिसून येत होतं. तो त्याचा व्यक्तिगत निर्णय आहे. पण, भज्जीने मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद स्वीकारून मुंबई इंडियन्सना पहिल्याच मॅचमध्ये विजय मिळवून दिला. यातून त्याच्यातील नेतृत्वगुण दिसून येतात, असं सौरव गांगुली म्हणाला.