मुंबई इंडियन्‍सला १३० रन्सचे टार्गेट

दादा सौरभ गांगुलीच्या पुणे वॉरियर्सने मुंबई इंडियन्‍सला विजयासाठी १३० रन्सचे टार्गेट दिले आहे. दरम्यान, आजच्‍या सामन्‍यात सचिन तेंडुलकरचा मुंबई संघात समावेश नाही. त्‍याच्‍याऐवजी सूर्यप्रताप यादवला संधी देण्‍यात आली आहे.

Updated: Apr 6, 2012, 06:03 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

दादा सौरभ गांगुलीच्या पुणे वॉरियर्सने मुंबई इंडियन्‍सला विजयासाठी १३० रन्सचे टार्गेट दिले आहे. दरम्यान, आजच्‍या सामन्‍यात सचिन तेंडुलकरचा मुंबई संघात समावेश नाही. त्‍याच्‍याऐवजी सूर्यप्रताप यादवला संधी देण्‍यात आली आहे.

 

 

पुणे वॉरियर्सने २०  षटकांमध्‍ये ९ बाद१२९ रन्स केल्या. पुण्‍याचा डाव  कोसळला  असताना रॉबिन उथप्‍पाने एक बाजू लावून धरली. रॉबिन उथप्‍पापाठोपाठ मार्लन सॅम्‍युअल्‍सही बाद झाला. मलिंगाने त्‍याचा त्रिफळा उडविला. उथप्‍पा ३६ रन्स काढून बाद झाला. तर सॅम्‍युअल्‍सने अवघ्‍या ४  रन्स काढल्‍या. त्‍यानंतर स्‍टीव्‍ह स्मिथने फटकेबाजी केली. त्‍याने ३९ रन्स काढल्‍या. अखेरच्‍या षटकांमध्‍ये मुरली कार्तिकने एक षटकार आणि एक चौकार ठोकून संघाच्‍या धावसंख्‍येत भर घातली. मलिंगाने ४ षटकांमध्‍ये १६ रन्स देत दोन फलंदाजांना बाद केले. तर मुनाफ पटेलने २६ रन्समध्‍ये दोन  विकेट घेतल्या.

 

पुणे वॉरियर्सला सुरुवातीलाच ४  झटपट धक्‍के बसले. कॅलम फग्‍युर्सन १२  रन्स काढून धावबाद झाला. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्‍यानंतर मुंबई इंडियन्‍सने पुणे वॉरियर्सला सुरुवातीलाच तीन धक्‍के दिले. सलामीवीर मनीष पांडे आणि सौरव गांगुली ही जोडी झटपट तंबूत परतली. त्‍यानंतर मुनाफ पटेलने वेन पार्नेलचा त्रिफळा उडवून तिसरा धक्‍का दिला. मनीष पांडेचा मलिंगाने त्रिफळा उडविला. तर सौरव गांगुलीला हरभजनने यष्टिचित केले.