वेलकम युवी, मायदेशात जोरदार स्वागत!

अमेरिकेत कॅन्सरवर यशस्वी उपचार झाल्यानंतर आणि लंडनमध्ये आराम केल्यानंतर भारताचा स्टार बॅट्समन युवराज सिंग आज भारतात परतणार आहे. सकाळी ९.३० वाजता युवराज दिल्लीत दाखल होणार आहे.

Updated: Apr 9, 2012, 10:04 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

अमेरिकेत कॅन्सरवर यशस्वी उपचार झाल्यानंतर आणि लंडनमध्ये आराम केल्यानंतर भारताचा स्टार बॅट्समन युवराज सिंग आज भारतात  परतला आहे. युवराजचे दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.

 

 

युवीने ट्विटर या सोशल कम्युनिटी साईटवर भारतात आज येणार असल्याचं ट्विट केलं...कॅन्सरवरील उपचारामुळे करण्यात आलेल्या केमोथेरपीमुळे अशक्त बनलेला युवराज आणखी काही महिने खेळू शकणार नाही आहे. मात्र आपण पुन्हा पूर्वीसारखं खेळू शकू असं युवराजनं म्हंटलय. सलग ४ आयपीएल खेळणा-या युवीनं या सिझनमध्ये आपल्याला खेळता आलं नसल्याची खंत यापूर्वीच ट्विटवरवरून व्यक्त केली होती.

 

 

पण युवी मैदानात नसला तरी त्याच्या मैदानाबाहेरील उपस्थितीनंही चाहत्यांना आनंद मिळणारय. विशेष करून पुणे वॉरियर्स टीमचा उत्साह युवराजच्या आगमनानंतर आणखीनच वाढणार आहे.

 

[jwplayer mediaid="79663"]