संघात कोणतेही मतभेद नाहीत - धोनी

भारतीय क्रिकेट संघात कोणतेही मतभेद नसल्याचा खुलासा स्वतः कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने केला आहे. धोनी आणि सेहवागऐवजी इरफान पठाण मीडियासमोर आल्यानं टीम इंडियातल्या ऑल इज वेलबाबत पुन्हा एकदा शंका निर्माण झाली होती. त्यामुळे धोनीने हा खुलासा केल्याचे सांगण्यात येत आहे.

Updated: Feb 25, 2012, 12:46 PM IST

www.24taas.com,  सिडनी

 

 

भारतीय क्रिकेट संघात कोणतेही मतभेद नसल्याचा खुलासा   स्वतः कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने केला आहे. धोनी आणि सेहवागऐवजी इरफान पठाण मीडियासमोर आल्यानं टीम इंडियातल्या ऑल इज वेलबाबत पुन्हा एकदा शंका निर्माण झाली होती. त्यामुळे धोनीने हा खुलासा केल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

बीसीसीआयनं धोनी आणि सेहवागला मीडियासमोर एकत्र येण्यास सांगितलं होतं. तरीही पत्रकारपरिषदेत इरफान पठाणला पाठवण्यात आलं. भारतीय टीम एकजूट आहे त्यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नसल्याच मत टीम इंडियाच्या मीडिया मॅनेजरनं व्य़क्त केलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही इथे जिंकण्यासाठी आलो असल्याचं भारताचा फास्ट बॉलर इरफान पठाणनं स्पष्ट केलं होतं. वरिष्ठ खेळाडूंबाबत बोलताना धोनी सांगितले, की सेहवाग आणि माझ्यात कोणतेही मतभेद नसून, आमच्यात कोणत्याही प्रश्नावरून वादविवाद नाहीत. मतभेदाचे वृत्त आल्यानंतर आम्ही ड्रेसिंग रुममध्ये आनंदी असायचो.

 

 

सामन्यात चांगले प्रदर्शन न झाल्यास अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात, असे धोनी म्हणाला होता.  मात्र, यामध्ये तथ्य काही नसते. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. संघामध्ये वरिष्ठ खेळाडूविरुद्ध कोणतेही वाद नाहीत. रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात रोटोशन पद्धत वापरण्यात येणार नसून, तिन्ही वरिष्ठ खेळाडूंना संघात स्थान देण्यात येणार आहे. झहीर खान दुखापतग्रस्त असल्याने तो या सामन्यात खेळणार नाही. तर विनय कुमारबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असेही धोनीने म्हटले होते. दरम्यान, भारतीय संघाचे व्यवस्थापक जी. एस. वालिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत आपण संघातील प्रत्येक खेळाडूशी चर्चा केली असून, कोणतेही मतभेद नसल्याचे म्हटले होते. इरफान पठाणनेही मतभेद असल्याचे वृत्त निराधार असल्याचे म्हटले होते.

 

 

दरम्यान,  मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील घटनांमुळेच टीम इंडियाचा वाईस कॅप्टन वीरेंद्र सेहवाग सध्या अधिक चर्चेमध्ये आहे. आऊट ऑफ फॉर्म असलेल्या वीरूला मॅचविनरची भूमिका बजावता आलेली नाही किंवा एकदाही चांगली ओपनिंग करुन देता आली नाही. त्यामुळे आपल्यावर होत असलेल्या टीकेच उत्तर त्यानं आपल्या बॅटनं द्याव अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना असणार आहे.