सेहवाग बाद, सचिन मैदानात

पॅटिन्सनने सेहवागला ६७ रन्सवर क्लीन बोल्ड केलं आहे. त्यामुळे द्रविडला साथ द्यायला आता मास्टर ब्लास्टर सचिन मैदानात उतरला आहे. द्रविडच्या २५ रन्स झालेल्या आहेत.

Updated: Dec 27, 2011, 12:06 PM IST

झी २४ तास वेब टीम, मेलबर्न

 

पॅटिन्सनने सेहवागला ६७ रन्सवर क्लीन बोल्ड केलं आहे. त्यामुळे  द्रविडला साथ द्यायला आता मास्टर ब्लास्टर सचिन मैदानात उतरला आहे. द्रविडच्या २५ रन्स झालेल्या आहेत.  गौतम गंभीर ३ रन्सवर बाद झालयावर विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड बॅटिंग करत होते. सेहवागने आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं.  याचबरोबर सेहवागच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८००० धावांचा टप्पा पूर्ण झाला.

 

ऑस्ट्रेलियन टीमला ३५० रन्सच्या आत ऑलआऊट केल्यानंतर टीम इंडियानं आश्वासक सुरुवात केली. बॉलर्सनी चांगली कामगिरी केल्यानंतर आता भारतीय बॅट्समननवर भिस्त असणार आहे. टेस्टवर पकड मिळविण्यासाठी टीम इंडयाच्या बॅट्समनना जबरदस्त बॅटिंग करावी लागणार आहे.

 

 

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.