हैदराबादमध्ये दोन शक्तीशाली स्फोट, १० ठार ५० जखमी

हैदराबादमध्ये दोन शक्तीशाली स्फोट, १० ठार ५० जखमी

Updated: Feb 21, 2013, 08:38 PM IST

www.24taas.com, हैद्राबाद
हैदराबादमधील दिलसुखनगरमधील वेंकटाद्री थिएटर आणि बसस्टॉपजवळ स्फोट झाले आहेत. दोन शक्तीशाली स्फोट झाल्याचे वृत्त हाती येत आहे.
या दोन स्फोटात १० जण ठार तर ५० जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त समजते आहे. अतिशय गजबजलेल्या या परिसरात हा स्फोट झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
स्फोटानंतर हैदराबाद परिसरात खबराट झाली आहे. हे स्फोट कशामुळे झाले आहे याबाबत अजूनतरी कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध झालेली नाही.

हैदराबादमध्ये तीन स्फोट, NSGची टीम हैदराबादला रवाना

- दिलसुखनगरमध्ये तीन स्फोट
- पहिला आनंदकिशनमध्ये स्फोट
- दुसरा स्फोट कोणार्क थिएटरजवळ स्फोट
- तिसरा स्फोट व्यंकटाद्री थिएटरजवळ
- हैदराबादमधील स्फोटात १० ठार ५० जखमी