www.24taas.com, पुणे
महापालिका निवडणुका आटोपल्या पण निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी राडेबाजीला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर देखील वातावरण चागलंच तापलेलं आहे. निवडणुकीचा प्रचार केला नाही म्हणून नागपूरला एका कार्यकर्त्याचा मनसे उमेदवाराने खून केला.
याला काही काळ उलटत नाही तोच पुण्यात निवडणुकीच्या वादातून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळं पाषणा सुतारवाडी परिसरात तणावाचं वातावरण पसरलं आहे. या परिसरात राष्ट्रवादीच्या उमेदवार रोहिणी चिमटे यांचा विजय झाल्यानं नैराश्यातून राष्ट्रवादीच्याच दुसऱ्या गटाकडून चिमटेंच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली आहे. यात ३० ते ४० गाड्यांचं नुकसान झालं असून त्याचा सामान्य नागरिकांना फटका बसला आहे.
या घटनेनंतर परिसरात मोठ्य़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी रोहिणी चिमटे यांनी आबा सुतार यांनी हे कृत्य केलं असल्याचा आरोप केला आहे. आबा सुतार यांच्याविरोधात चतु:श्रुंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.