हैदराबाद स्फोट-आयईडीसह १ किलो स्फोटके वापरली

हैदराबाद येथील दिलसुखनगरमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दिलसुखनगर भागातील घटनास्थळाजवळील एका खांबावर असलेल्या सीसीटीव्हीचे कनेक्शन चार दिवसांपूर्वीच कापले गेले होते.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 23, 2013, 09:57 AM IST

www.24taas.com, हैदराबाद
लाइव्ह अपडेट्स -
• हैदराबाद येथे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केलेल्या इंडियन मुजाहीद्दीनच्या दहशतवाद्याची दिल्ली आणि हैदराबाद पोलीस चौकशी करणार आहेत.
• लोकसभेत हैदराबाद स्फोटावरून गदारोळ लोकसभा ३.३० वाजेपर्यंत तहकूब.
• गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेच्या लोकसभेतील वक्तव्यानंतर या संदर्भात चर्चा होणार नसल्याचे लोकसभेचे उपाध्यक्ष करिया मुंडा यांनी जाहीर केल्यानंतर लोकसभेत गदारोळ
• हैदराबादमधील प्रत्येक स्फोटात १ किलो स्फोटके वापण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळावरून लाल आणि करड्या रंगाचे द्रव्य सापडले. स्फोट घडविण्यासाठी टायमरचा वापर करण्यात आला होता.
• स्फोट रुटीन असल्याच्या सुशीलकुमार शिंदेच्या वक्तव्याचा भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी निषेध व्यक्त केला.
• स्फोटकांसाठी आयईडीचा वापर करण्यात आला होता. हे स्फोटकं सायकलीवर ठेवण्यात आले होते. तपास यंत्रणाच्या तपासात निष्पन्न. सुशीलकुमारांचे लोकसभेत वक्तव्य.
• एनआयए आणि इतर तपास यंत्रणांनी घटनास्थळावरून फॉरेन्सिकचे पुरावे गोळा केले.
• भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह आणि प्रवक्ते शेहनवाज हुसे यांनी घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.
• पाकिस्तानने स्फोटांचा निषेध केला.

हैदराबाद येथील दिलसुखनगरमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दिलसुखनगर भागातील घटनास्थळाजवळील एका खांबावर असलेल्या सीसीटीव्हीचे कनेक्शन चार दिवसांपूर्वीच कापले गेले होते.
स्फोटासंदर्भातील महत्त्वपूर्ण पुरावा या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मिळाला असता परंतु, आता हे कनेक्शन कापले गेल्यामुळे तपास यंत्रणेच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीसीटीव्हीचे कनेक्शन कोणी कापले या संदर्भात आता पोलिस तपास करीत असून या दहशतवादी होते का याचा तपास पोलिस लावत आहेत.

स्फोटांमध्ये अमोनियम नायट्रेडचा वापर
हैदराबाद स्फोटांना १६ तास उलटून गेल्यानंतर आता अनेक आघाड्यांवर याचा तपास सुरू आहे. एकीकडे फोरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळावर काही धागेदोरे हाती लागतायत का? याचा शोध घेतायत तर दुसरीकडे गुप्तचर यंत्रणाही कामाला लागल्यात.

पुण्यातल्या जंगली महाराज रोडवरील स्फोटांशी याचं साधर्म्य असल्यानं संशयाची सुई पुन्हा इंडियन मुजाहिद्दीनवर रोखली गेलीये. स्फोटांसाठी अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. घटनास्थळी लोखंडी खिळे आणि टोकदार धातुचे तुकडे सापडले असून स्थानिक तपास अधिकाऱ्यांनी या स्फोटासाठी आरडीएक्सच्या वापराची शक्यता नाकारलीय. हैदराबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर तपास कामात वेग आलाय. स्फोटाचा करण्यासाठी घटनास्थळी एनआयए, मुंबई एटीएस आणि आंध्र पोलिसांची टीम दाखल झालीय. या सर्व टीम्सकडून घटनास्थळाची कसून चाचपणी होतीय.
दरम्यान, हैदराबाद स्फोटातल्या मृतांची संख्या १४ वर पोहोचलीये. तर ११९ जण यात जखमी झाले असून यातले ६ जण गंभीर आहेत. मृतांच्या नातलगांना आंध्र सरकारनं सहा लाख तर केंद्र सरकारनं दोन लाखांची मदत केलीय. गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट दिली.