मनसे, बविआच्या निलंबित आमदारांना जामीन

पीएसआय सचिन सूर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळाला आहे. तीन दिवस त्यांना जेलमध्ये काढावे लागले. त्यांची १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 25, 2013, 02:10 PM IST

www.24taas.com,मुंबई
पीएसआय सचिन सूर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळाला आहे. तीन दिवस त्यांना जेलमध्ये काढावे लागले. त्यांची १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आलेय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम आणि बविआचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याने त्यांच्यावर मरिन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या मारहाणीचे राज्यात तीव्र पडसाद उमटलेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलिसांवर हात उगणाऱ्यांना पाठिशी घातले जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. यामध्ये मनसेचा आमदार असेल तर जरूर कारवाई करण्याचे स्पष्ट बजावले होते.

मारहाण प्रकरणी शिवसेनेचे दोन, भाजपचा एक, मनसेचा एक आणि बविआचा एक अशा पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यापैकी मनसेचे आमदार राम कदम आणि भारिपचे क्षितिज ठाकूर यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे राजकीय वर्तुळातून तीव्र पडसाद उमटले. राज ठाकरे यांनीही कारवाई करताना दोघांवरच कारवाई का, असा सवाल थेट अमरावतीच्या सभेत उपस्थित केला. याबाबत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
दरम्यान, पोलिसांनी ताठर भूमिका घेतल्यामुळे आमदार नाराज आहेत. विधीमंडळात त्याचे पडसाद उमटले आहेत. हे आमदार पुरावे नष्ट करू शकतात, असं कारण सांगत पोलिसांनी जामिनास विरोध केला होता. यामुळे सर्वपक्षीय आमदारांमध्ये नाराजी आहे. तसंच हे प्रकरण जास्त न वाढवण्याचे आदेश गृहमंत्रालयानं पोलिसांना दिले होते. हे आदेश धाब्यावर बसवून पोलिसांनी आमदारांविरोधात आघाडी उघडल्याचा आरोप केला जात आहे.