अनन्य सन्मान २०१२

By Prashant Jadhav | Last Updated: Tuesday, January 29, 2013 - 19:25

प्रगतीशील भारतात महाराष्ट्राला ऐतिहासिक महत्त्व आहे. महाराष्ट्रात अशा महान व्यक्तींचा जन्म झाला आहे की ज्यांनी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यात सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. राजकारण, संगीत, क्रीडा, चित्रपट, साहित्य, नाटक, फॅशन, व्यवसाय, सामाजिक कार्य, शेती, पत्रकारिता आणि वैद्यकीय क्षेत्रात अनेकांनी आपली छाप सोडली आहे. अनेक मराठी व्यक्तींचा देशाच्या यशात सिंहाचा वाटा आहे.
आजच्या प्रसिद्धीसाठी काही करणाऱ्यांच्या जमान्यात प्रसिद्धीच्या मागे न धावता स्वच्छ अंतःकरणानं काम करणाऱ्या वल्ली महाराष्ट्राच्या माती आपली छाप सोडत आहेत. आपल्या क्षेत्रात काम करताना त्यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखली आहे. आता अद्भूत कामगिरी करणाऱ्या वल्लीची जगाला ओळख करून देण्याची वेळ आहे.
शाळेच्या उभारणीसाठी एक अवलिया लोकल ट्रेनमध्ये पैसे गोळा करतोयं. कबड्डीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यासाठी एक द्रोणाचार्य मेहनत घेत आहेत. स्फोटकं निकामी करताना एका पोलिस हवालदाराने आपला हात गमावला, या आणि अशा समाजातील रिअल हिरोंनाचा सन्मान करण्याची वेळ आली आहे. झी २४ तास अशा रिअल हिरोंना मानचा मुजरा करीत आहे.
महाराष्ट्रातील या खऱ्या नायकांचा सन्मान करण्याचा मान झी २४ तास या पहिल्या मराठी न्यूज चॅनलला जातो. समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल झी २४ तास अनन्य सन्मान देण्यात येतो. या व्यासपीठाद्वारे या प्रसिद्धीपासून दूर असलेल्या व्यक्तींवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न आहे.
अनन्य सन्मानाची सुरूवात २००८ मध्ये करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील अद्वितिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले. तर २००९, २०१०, २०११ या वर्षी रिअल हिरोंना सन्मानित करण्यात आले.
गेल्या चार वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही विविध क्षेत्रातील रिअल हिरोंना सन्मानित करण्यात येणार आहे. यात... मनोरंजन, क्रीडा, शेती, शिक्षण, समाज कार्य आणि शौर्य. या क्षेत्रातील पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल.

.

First Published: Tuesday, January 29, 2013 - 19:20
comments powered by Disqus