गोयात रंगतली गझलेची सांज..

गझल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. गझल सागर प्रतिष्टान आणि गोवा कला अकादमी यांच्या वतीने गोव्यात १४ आणि १५ जानेवारीला सहावे मराठी गझल संमेलन रंगणार आहे. ज्येष्ठ गझलकार घनश्याम धेंडे हे या संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहे.

Updated: Jan 3, 2012, 03:41 PM IST

www.24taas.com, पणजी

 

गझल.. उर्दू साहित्यातून मजल दरमजल करत गझलनेही आता मराठीतही आपली पताका रोवलीय. मराठी साहित्येच्या प्रांगणात उगवणारे हे रोपटे आता हळूहळ बहारायला सुरुवात झालीय. भाऊराव पाटणकर यांचा वारसा सांगत आता अनेक गझलकार आता समोर येतायतं.

 

अशाच गझल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. गझल सागर प्रतिष्टान आणि गोवा कला अकादमी यांच्या वतीने गोव्यात १४ आणि १५ जानेवारीला सहावे मराठी गझल संमेलन रंगणार आहे. ज्येष्ठ गझलकार घनश्याम धेंडे हे या संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहे.

 

गोव्याच्या चंदेरी वाळूत उसळणा-या गझलाचा लांटानी गझलप्रेमीचे मन आनंदून गेलय. १४ तारखेला सकाळी अकरा वाजता गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सिनेमा दिग्दर्शक राजदत्त, अभिनेत्री आशालता वाबगावकर उपस्थित राहणार आहेत.

 

दुपारी दोन 'मराठी गझल,  सुरेश भटानंतर' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आलयं. अशा अनेक गझलमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलयं. संमेलनाचा समारोप पद्मश्री प्रसाद सावकार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी गझल मराठी मनात रुजवणारे गझलनवाझ भीमराव पांचाळे यांच्या गझलगायनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. एकूणच या संमेलनाच्या निमित्ताने कोकणी मदहोषीला मराठी गझलाचा मदमस्त गंध मिळणार आहे.