आलं धनुषचं नवं 'सचिन साँग' !

सचिन तेंडुलकरच्या फॅन्ससाठी खूषखबर ! 'कोलावरी डी' गाण्यानंतर समस्त तरुणाईचा ताईत बनलेला धनुष याचं नवं सचिन तेंडुलकर गीत प्रसिद्ध झालं आहे. तामिळ स्टार धनुषने क्रिकेटच्या देवावर रचलेलं गीत यूट्युबवर पाहायला मिळेल.

Updated: Feb 10, 2012, 11:07 AM IST

www.24taas.com, मुंबई

सचिन तेंडुलकरच्या फॅन्ससाठी खूषखबर ! 'कोलावरी डी' गाण्यानंतर समस्त तरुणाईचा ताईत बनलेला धनुष याचं नवं सचिन तेंडुलकर गीत प्रसिद्ध झालं आहे. तामिळ स्टार धनुषने क्रिकेटच्या देवावर रचलेलं गीत यूट्युबवर पाहायला मिळेल.

यूट्युबवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडियोची ट्विटरवर घोषणा करताना धनुषने लिहीलं आहे, “सचिन साँग आता अधिकृतरीत्या प्रसिद्ध झालेलं आहे. ही त्याची लिंक बघा :) सगळ्यांनी मिळून गाऊया. सचिनच्या सर्वसामान्य फॅनने केलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे. देव त्याचं भलं करो.”

तरूण आणि सध्या कमालीच्या गाजत असलेल्या संगीतकार अनिरुद्ध रवीचंदरनेही आपला उत्साह ट्विटरवर व्यक्त केला आहे. “सचिन गीत आलेलं आहे. लोक हो, नक्की पाहा. J  कोलावरी डी हे तर राष्ट्रगीतच बनून गेलं होतं. सचिन गीतही तितकंच प्रसिद्ध होईल अशी आशा करतो.”

धनुष आणि अनिरुद्धला शुभेच्छा !