धुळ्यातील पीकपाणी

धुळे जिल्ह्यात कपाशीचं पोषण न झाल्याने आकस्मात मर रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसून येतोय. या रोगाने जिल्ह्यात शेकडो हेक्टर कापूस नेस्तनाबूत केलाय. त्यामुळे कृषी विभागानं शेतक-यांच्या बांधावर जावून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रात्यक्षिक करुन दाखवली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 16, 2012, 08:30 AM IST

www.24taas.com, धुळे
धुळे जिल्ह्यात कपाशीचं पोषण न झाल्याने आकस्मात मर रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसून येतोय. या रोगाने जिल्ह्यात शेकडो हेक्टर कापूस नेस्तनाबूत केलाय. त्यामुळे कृषी विभागानं शेतक-यांच्या बांधावर जावून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रात्यक्षिक करुन दाखवली.
धुळे जिल्ह्यात ठिबक सिंचन पद्धतीने लागवड केलेल्या कापसावर मर रोगाची लक्षणं मोठ्या प्रमाणात दिसून येतायत. पीकाचं पोषण व्यवस्थित न झाल्याचा हा परिणाम असल्याचं कृषी महाविद्यालयाच्या संशोधनात समोर आलंय. मर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागानं थेट शेतक-यांच्या बांधावर जाउन त्यांना मार्गदर्शन करण सुरु केलं आहे.
ठिबक सिंचनाखाली असणा-या कपाशीवरील मर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकरी दिड टक्के युरिया आणि दिड टक्के म्युरेट ऑफ पोटॅश्या खत देण्याची शिफारस कृषी विभागाने केली आहे. सुक्ष्म मुलद्रव्य, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट आणि बोरॅक्स अशा विद्राव्य खते देउन आपल्या पिकाचं परिपूर्ण पोषण होत असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
शेतक-यांच्या बांधावर कृषी अधिकारी प्रात्यक्षिक देत असल्यानं कृषी विभागा विषयी विश्वासार्हताही वाढीस लागली आहे. येत्या काळात कृषी विभागाची अशीच तत्परता दिसली तर शेतक-यांचं नक्कीच उत्कर्ष होईल.