गोपीनाथ काकांच्या कारखान्यावर पुतण्याचा मोर्चा!

परळीत धनंजय मुंडे यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर मोर्चा काढला. शेतक-यांच्या उसाला २२५० रुपये पहिला हप्ता द्यावा, या मागणीसह विविध मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढून वैद्यनाथ कारखान्यावर धडक दिली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 1, 2013, 09:24 AM IST

www.24taas.com, परळी
परळीत धनंजय मुंडे यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर मोर्चा काढला. शेतक-यांच्या उसाला २२५० रुपये पहिला हप्ता द्यावा, या मागणीसह विविध मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढून वैद्यनाथ कारखान्यावर धडक दिली.
वैद्यनाथ कारखाना हा गोपीनाथ मुंडे यांच्या मालकीचा आहे. कारखान्याच्या निधीतून धनंजय मुंडे यांनी आपले काका गोपीनाथ मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. , मागील वर्षी झालेला हा संघर्ष अधिकच होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीशी जवळीक असणारे आमदार धनंजय मुंडे यांनी मागील वर्षापासून आपले काका गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. जिल्हा परिषद असो किंवा ग्रामपंचायत डी एम विरुद्ध जी एम असा संघर्ष महाराष्ट्राने पहिला आहे.

याच संघर्षाचा पुढचा अंक आज पाहायला मिळाला.धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या उसाला २२५० चा पहिला हप्ता मिळावा आणि कपात केलेली २० % रक्कम परत द्यावी, यासह वैद्यनाथ कारखान्यातील भ्रष्टाचारावर बोट ठेवून हजारो शेतक-यांनी मोर्चा काढला.