उद्धव ठाकरे यांना सेनाप्रमुखांचे अधिकार

शिवसेनाप्रमुखपदाचे सर्वाधिकार शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेत. शिवसेना नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 2, 2012, 06:03 PM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुखपदाचे सर्वाधिकार शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेत. शिवसेना नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर पक्ष नेत्यांची महत्वपूर्ण बैठक काल मातोश्री इथं झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी भावूक वातावरण होतं.

ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधार डाके, सुभाष देसाई, संजय राऊत, रामदास कदम बैठकीला हजर होते. शिवसेनाप्रमुखांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली वचनबद्ध असल्याचा विश्वास सर्व नेत्यांनी व्यक्त केला.