तुळसी माते बहु पुण्यपावनी... - Marathi News 24taas.com

तुळसी माते बहु पुण्यपावनी...

www.24taas.com, मुंबई
 
देवासमोर ठेवलेल्या नैवेद्यावर नेहमी तुळशीचं पान ठेवलं जातं. ग्रहणकाळात खाद्यपदार्थांवर तसंच पिण्याच्या पाण्यातही तुळशीची पानं टाकली जातात. यामागे केवळ अंधश्रद्धा नसून महत्वाचं शास्त्र आहे.
 
आयुर्वेद हे ही धर्मशास्त्राचंच एक भाग बनलं आहे. त्यामुळे धर्मशास्त्र आणि आयुर्वेद या दोन्हींमध्ये तुळशीच्या रोपाला अनन्यसाधारण महत्व आहे. तुळशीच्या रोपामुळे घरातील लोकांचं स्वास्थ चांगलं राहातं. तुळशीमधील ओषधी गुणधर्मामुळे सभोवतालच्या वातावरणातील विषाणू मरतात. यामुळेच घराच्या आंगणात पूर्वी तुळशीचं रोप लावलं जाई. रोज तुळशीचं एक पान खाण्याचा सल्लाही आयुर्वेदात दिला जातो. म्हणूनच नैवेद्यावर नेहमी तुळशीचं पान ठेवलं जातं. तुळस तिच्यातील वैद्यकीय गुणधर्मांमुळेच पवित्र मानली जाते.
ग्रहणकाळात खाद्य अपवित्र झाल्याचं मानलं जातं. याचं कारण म्हणजे ग्रहण काळात अनेक जीवाणू, विषाणूंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. असे पदार्थ खाण्यायोग्य राहात नाहीत. त्यामुळे त्यांना अपवित्र मानलं जातं. मात्र ग्रहणकाळात या पदार्थांवर तुळशीची पानं ठेवल्यास बॅक्टेरिया वाढू शकत नाही. यामुले अन्नपदार्थ आणि पाणी सुस्थितीत राहातं, शुद्ध होतं.त्यामुळेच तुळशीला धर्मशास्त्रात महत्व देण्यात आलं आहे.

First Published: Wednesday, August 01, 2012, 15:53


comments powered by Disqus