धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करण्याचा बेस्ट मुहूर्त...

धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करायचा बेत असेल... तर त्यासाठी संध्याकाळची वेळ बेस्ट मुहूर्त असल्याचं सांगण्यात येतंय.

Updated: Nov 7, 2015, 11:37 AM IST
धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करण्याचा बेस्ट मुहूर्त...  title=

मुंबई : धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करायचा बेत असेल... तर त्यासाठी संध्याकाळची वेळ बेस्ट मुहूर्त असल्याचं सांगण्यात येतंय.

धनत्रयोदशीच्या दिवशी विष्णु-लक्ष्मी पूजन केल्यानं लक्ष्मीची सदैव कृपा राहते, असं म्हटलं जातं. ज्योतिषाचार्यांच्या म्हणण्यानुसार, तुम्हाचाही या दिवशी बाईक, कार, सोन्याचे दागिने, प्रॉपर्टी, जमीन, इलेक्ट्रॉनिक सामान, कपडे किंवा इतर काही गोष्टी खरेदी करण्याचा बेत असेल तर तु्म्ही या शुभ मुहूर्तावर नक्कीच खरेदी करू शकता.

रविवारी सायंकाळी 4.34 पासून धनत्रयोदशीचा मुहूर्त आहे... तो सोमवारी सायंकाळी 6.43 पर्यंत सुरू राहील. धनत्रयोदशीच्या दिवशी घरी पूजा करण्यासाठी सायंकाळी 5.34 ते 7.31 पर्यंत पूजेचा मुहूर्त राहिल.ॉ

या दिवशी भगवन्तरीची पूजाही तुम्ही करू शकाल. या दिवसाला कामेश्वरी जयंती असंही म्हटलं जातं. कारण, या पूजनामुळे मनातील कामना पूर्ण होतात, असं मानलं जातं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.