बजेट २०१३-१४ पहा ह्या गोष्टी झाल्या स्वस्त

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज संसदेत बजेट २०१३ - १४ या वर्षासाठी मांडला. हा बजेट पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मांडण्यात आल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

Updated: Feb 28, 2013, 01:27 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज संसदेत बजेट २०१३ - १४ या वर्षासाठी मांडला. हा बजेट पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मांडण्यात आल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. यात अनेक गोष्टी स्वत झाल्या आहेत, तर टॅक्समध्येही काहीही बदल करण्यात आलेले नाही. तर महिलांचा राजकारणातील वाढता सहभाग लक्षात घेता महिलांसाठी मोठ्या प्रमाणात अनेक तरतूदी करण्यात आल्या आहेत.
>तयार कपडे स्वस्त होणार
>सोनं स्वस्त होणार
>कृषी परिक्षण प्रकिया स्वस्त होणार
>जहाज वाहतूक स्वस्त होणार
>सिंगल स्क्रिन सिनेमा दर स्वस्त होणार
>चामड्याच्या वस्तू बनविणाऱ्या मशीन स्वस्त होणार
>परदेशी बूट स्वस्त होणार

>चामड्याच्‍या जोड्यांवर निर्यात करात घट
>पहिल्यांदा गृहकर्ज घेणा-यास २५ लाखांपर्यंतच्या रकमेसाठी एक लाख रुपये कर सवलत
>५ लाख उत्पन्न - २०६० रुपये फायदा
>४ लाख उत्पन्न - २०६० रुपये फायदा
>३ लाख उत्पन्न - २०६० रुपये फायदा
>इन्कम टॅक्समध्ये तुमचा फायदा - १ लाख उत्पन्न - ० रुपये
>महिला १ लाख रुपयांपर्यंतचे सोने परदेशातून आणू शकतात
>२ लाख २० हजार उत्पन्नावर टॅक्स नाही
>सर्विस टॅक्स (सेवा कर) कोणताही बदल नाही