स्पॉट फिक्सिंग : अंकित, श्रीशांतचा जामीनासाठी अर्ज

स्पॉट फिक्सिंगप्रकऱणी अटक करण्यात आलेल्या अंकित चव्हाणसह तीन बुकींना ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, अंकित चव्हाण आणि एस. श्रीशांतनं जामीनासाठी अर्ज केला आहे.

May 27, 2013, 11:17 AM IST

सचिनचा आयपीएल क्रिकेटला रामराम

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं IPLमधून रिटायर्टमेंट घेतली. वयाचं कारण पुढे करत सचिननं IPL ला अलविदा म्हटलंय. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर सचिननं ही घोषणा केलीये.

May 27, 2013, 07:37 AM IST

मुंबई इंडियन्स ठरले IPL- 6 चॅम्पियन

मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपरकिंग्जवर मात करत आयपीएलच्या सहाव्या सीझनचं विजेतेपद पटकावलं. मुंबईचं हे आयपीएलचं पहिलं-वहिलं अजिंक्यपद ठरलं आहे.

May 27, 2013, 12:15 AM IST

फायनल स्कोअरकार्ड: मुंबई X चेन्नई

फायनल स्कोअरकार्ड: मुंबई X चेन्नई

May 26, 2013, 08:29 PM IST

मय्यप्पन निलंबित, चेन्नईत मुंबई पोलिसांचा छापा

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नईचा सीईओ गुरूनाथ मय्यप्पन याचा हात असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचे बीसीसीआयने निलंबन केले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी त्याच्या घरावर चेन्नईत छापा मारला.

May 26, 2013, 01:43 PM IST

फिक्सिंगबाबत नवा कायदा आणणार - सिब्बल

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील `स्पॉट फिक्सिंग`चा घोडेबाजार उघड झाल्याच्या पार्श्ववभूमीवर केवळ क्रिकेटच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमधील अशा गैरकृत्यांना रोखण्यासाठी एक स्वतंत्र आणि सर्वंकष नवा कायदा करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी जाहीर केले.

May 26, 2013, 07:57 AM IST

निराश द्रवीड निवृत्तीच्या विचारात!

वादांत अडकलेल्या राजस्थान रॉयल्सचा या सत्रातील कॅप्टन आणि भारताचा अनुभवी राहुल द्रवीडला आयपीएलमधून संन्यास घ्यायचाय.

May 25, 2013, 07:06 PM IST

मी राजीनामा देणार नाही - श्रीनिवासन

श्रीनिवासन यांच्या बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा निश्चित मानण्यात येतोय. त्यामुळं त्यांच्या जागेवर आता प्रभारी अध्यक्षाची वर्णी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मी राजीनामा देणार नाही, अशी भूमिका घेत श्रीनिवासन यांनी बीसीसीआयला पेचात टाकलं आहे.

May 25, 2013, 02:09 PM IST

श्रीनिवासनना जावई नडला, देणार राजीनामा?

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मुय्यप्पन यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

May 25, 2013, 12:25 PM IST

मुंबईची राजस्थानवर मात, अंतिम फेरीत धडक

कोलकाता - अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत ड्वेन स्मिथच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या क्वालिफायर लढतीत राजस्थान रॉयल्सचा ४ विकेट आणि एक बॉल राखून पराभव केला आणि आयपीएलच्या सहाव्या पर्वात फायनलमध्ये धडक मारली. रविवारी रंगणार फायनल लढतीत मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान असणार आहे.

May 25, 2013, 07:49 AM IST

CSKने झटकले हात, श्रीनिवासन यांची पडणार खाट?

फिक्सिंगप्रकरणात नाव अडकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सची मालकी असलेल्‍या इंडिया सिमेंट्स या कंपनीने मय्यपन यांच्यापासून हात झटकले आहेत. मय्यपन हे सीएसके संघाचे सीईओ पदावर नव्हते. ते केवळ संघ व्यवस्थापन एक सदस्य आहेत.

May 24, 2013, 06:27 PM IST

श्रीनिवासनच्या मुलाचा आरोप मय्यपनचे बुकींशी संबंध

बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मय्यपनच्या अडचणीत भर पडलीये. श्रीनिवासन यांचा मुलगा अश्विन यानं मय्यपनचे बुकिंशी घनिष्ट संबंध असल्याचं सांगत त्याला घरचा आहेर दिलाय.

May 24, 2013, 12:49 PM IST

फिक्सिंग: काही खेळाडू, टीमही सहभागी- नीरज कुमार

आयपीएल फि्क्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती आणखी महत्त्वाची माहिती आली आहे. दिल्ली पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी काल स्पष्ट केले.

May 24, 2013, 11:05 AM IST

फिक्सिंगमध्ये पाक अंपायर, रऊफला चौकशी बोलावले

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पाकिस्तानचे अंपायर असद रऊफ यांचे नाव समोर येत आहे. असद यांचा विंदू दारा सिंग यांच्या संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी असद रऊफ यांच्या विरोधात समन्स बजावला आहे.

May 23, 2013, 06:50 PM IST

मय्यपन यांना कोणत्याही क्षणी होणार अटक

स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम चेन्नईत दाखल झाली असून मय्यपन यांना उद्यापर्यंत हजर राहण्याचा समन्स बजावला आहे. मय्यपन याला दिसताक्षणी अटक करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी टीमला दिले आहे.

May 23, 2013, 04:42 PM IST

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना - साक्षी धोनी

भारतीय क्रिकेट टीम आणि चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीने ट्विट केलं आहे की, कुछ `कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना।`

May 23, 2013, 03:56 PM IST

छोटा शकीलने सांगितले सर्वात मोठ्या बुकीचं नाव....

दाऊद इब्राहीमच्या डी कंपनीने बुधवारी सायंकाळी फिक्सिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे. डी कंपनीकडून छोटा शकीलने फोनवर बोलताना एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याचा किंवा डी कंपनीचा संबंध नाही.

May 23, 2013, 03:15 PM IST

IPL फिक्सिंग- दिल्ली पोलीस vs मुंबई पोलीस

स्पॉट फिक्सिंगप्रकरणात एकापाठोपाठ एक नवनवे खुलासे होताय... दिल्ली पोलिस आणि मुंबई पोलिसांमध्ये याप्रकरणात चढाओढ सुरु आहे...

May 22, 2013, 07:59 PM IST

फिक्सर खेळाडूंची गजाआड जाण्याची शक्यता नाही

एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला सध्या स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र फिक्सिंगबाबत भारतात सक्षम कायद्याच नसल्याने ते गजाआड जाण्याची शक्यता कमी असल्याच मत तज्ञ्ज व्यक्त करताहेत.

May 22, 2013, 06:55 PM IST

श्रीशांतची नवी ओळख...अय्याश श्रीशांत.....

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याचा हा अय्याशीचा चेहराही साऱ्यांसमोर आला.

May 22, 2013, 06:37 PM IST