राज ठाकरेंच्या भेटीचे टाटांचे ‘राज’ काय ?

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या ह्या घेतलेल्या भेटीमुळे नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Mar 8, 2013, 05:28 PM IST

राज ठाकरेंच्या भेटीला रतन टाटा !

टाटा उद्योग समूहाचे माजी अध्य़क्ष रतन टाटा हे कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. रतन टाटा ह्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे.

Mar 8, 2013, 04:33 PM IST

राज ठाकरे का झाले नाराज?

शिवसेना-भाजप आणि आरपीआय या महायुतीला मनसेचं इंजिन, असे प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार आहे. हे वृत्त दिशाभूल करणारं आहे, अशी माहिती खुद्द राज ठाकरे यांनी दिलीय. यावेळी राज ठाकरे यांनी बातमी संदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

Mar 8, 2013, 12:16 PM IST

राज ठाकरेंची तातडीनं चौकशी करा - न्यायालयाचे आदेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत केलेल्या वक्तव्यांचा तपास वेगानं केला जावा, असे आदेश दिल्ली कोर्टानं दिलेत. राज ठाकरे यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात येणाऱ्या उत्तर भारतीयांना घुसखोर असं संबोधलं होतं.

Mar 8, 2013, 10:50 AM IST

‘एटीएम’मधला ‘टी' बळकट होणार?

रामदास आठवले, उद्धव ठाकरे, आणि गोपीनाथ मुंडे अशी महायुतीचं ‘एटीएम’ म्हणून ओळखंल जात होते. मनसे महायुतीत सहभागी झाल्यास एटीएममध्ये आणखी एक ‘टी’ (ठाकरे) सहभागी होणार आहे. त्यामुळं या महायुतीतला ‘टी’ आणखी पॉवरफुल्ल होणार आहे.

Mar 8, 2013, 08:43 AM IST

महायुतीला मनसेचं ‘इंजिन’?

राज्याच्या राजकारात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रभाव मोडून काढण्यासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीत मनसेला सहभागी करुन घेण्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Mar 8, 2013, 08:24 AM IST

मनसेच्या चार कार्यकर्त्यांना मुंबईत अटक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अहमदनगर दौऱ्याच्यावेळी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली होती. याचे पडसाद मुंबईतही उमटले होते. तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये मनसेच्या विभागप्रमुखाचा समावेश आहे.

Mar 7, 2013, 01:04 PM IST

मनसेचा राष्ट्रवादी विरोध खरा की दिखावा?

राज ठाकरेंचा राज्यातला दौरा चांगलाच गाजला तो अजित पवार आणि राष्ट्रवादीवरच्या टीकेवरून.. दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे चांगलेच राजकारण रंगलं. आणि त्यातून हा वाद थेट दगडफेकीपर्यंत पोहोचला. मात्र मनसेचा राष्टवादी विरोध खरा आहे की दिखावा?

Mar 6, 2013, 06:29 PM IST

सिंचन घोटाळा : राज ठाकरेंना विनोद तावडेंचा टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी टोला लगावलाय. मनसे आमदारांना घोटाळा बाहेर काढणं जमलं तरी असतं का? सिंचन घोटाळा भारतीय जनता पक्षाने बाहेर काढलाय, असं तावडेंनी राज यांना प्रत्युत्तर केलंय.

Mar 6, 2013, 05:00 PM IST

मराठी हद्दपार : UPSCप्रकरणी राज ठाकरे गप्प का?

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC नं प्रादेशीक भाषांमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय काढून टाकलाय. आयोगाच्या या निर्णया विरोधात शिवसेनेनं हुतात्माचौकात आंदोलन केलंय. मात्र, मराठीच्या मुद्यासाठी रान उठवणा-या राज ठाकरेंच्या मनसेकडून या विषयावर अद्याप पर्यंत कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.

Mar 6, 2013, 04:30 PM IST

`राज ठाकरे म्हणजे संध्याकाळची एन्टरटेन्मेंट आहे`

`शेवटी संध्याकाळी दमून भागून घरी आल्यावर जेवताना, चहा पिताना... बायकोच्या शेजारी बसून चहा तिच्या हातचा घेताना काही तरी एन्टरटेनमेंट पाहिजे की नाही.’

Mar 6, 2013, 12:04 PM IST

जयंत पाटीलांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

राज ठाकरे यांची भाषणं म्हणजं संध्याकाळची एन्टरटेनमेंट आहे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी तोफ डागली आहे.

Mar 6, 2013, 10:54 AM IST

परप्रांतीय प्रकरण: मनसेच्या १० जणांवर गुन्हा दाखल

साताऱ्यातल्या सैनिकी शाळेत प्रवेश प्रक्रियेत गोंधळ घातल्याप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mar 5, 2013, 04:24 PM IST

राज ठाकरेंपुढे अजित दादा शांत का?

राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या वाग्युद्धामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विशेषतः दादांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Mar 4, 2013, 07:22 PM IST

दुष्काळात `आयपीएल`वर खर्च करणं पटतं का?- राज

दुष्काळात आयपीएल मॅचेस आयोजित करण्याबद्दल राज ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. त्यात आयपीएलला करमणूक करही माफ केला आहे. हे योग्य आहे का?

Mar 4, 2013, 06:08 PM IST

मला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका - राज

मी जालन्यात जाहीर केले. मात्र, पुण्यात माझी सभा नाही. तसेच पुण्यात माझा तसा काहीच कार्यक्रम नाही. पुण्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आव्हान दिल्याने मी पुण्यात जाणार असल्याचे जाहीर केलं. कोणीतरी तरी मुर्खासारखे बोलतं, त्यामुळे मी लक्ष घातलं एव्हढच, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं.

Mar 4, 2013, 06:04 PM IST

मराठी'राज'... 'माझी भूमिका मराठी माणसासाठीच...'

माझी भूमिका ही मराठी माणसांसाठीच आहे आणि त्यात अजिबात बदल होणार नाही, असं ठासून सांगत राज ठाकरेंनी एकप्रकारे आपल्या कार्यकर्त्यांच्या कृत्याचं समर्थनच केलंय.

Mar 4, 2013, 05:57 PM IST

`माझा पुण्यात कोणताही कार्यक्रम नाही`

मनसे आणि `दादां`च्या राष्ट्रवादीमध्ये शाब्दिक चकमकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यस्थाची भूमिका घेतली. राज यांना अडवू नये, अशी सूचना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पवारांनी केलीय. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद घेतलीय. पाहुयात काय काय म्हणालेत ते या पत्रकार परिषदेत...

Mar 4, 2013, 05:37 PM IST

`राज आणि अजित पवारांमधील युद्ध दुर्दैवी`

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरु असणारे युद्ध दुर्दैवी असल्याची टीका वनमंत्री पतंगराव कदम यांनी केली. सांगलीमध्ये कदम प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Mar 3, 2013, 07:44 PM IST

राज ठाकरे हे नकलाकार - सुशीलकुमार शिंदे

राज ठाकरे हे नकलाकार असून ते नकलाच करणार असा टोला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावलाय. गेल्या आठवड्यात झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी शिंदे यांची खिल्ली उडविली होती. याची परतफेड शिंदे यांनी आज सोलापुरात पत्रकार परिषेदेत केली आहे.

Mar 3, 2013, 07:30 PM IST