एकाच या जन्मी जणू....

Last Updated: Wednesday, December 28, 2011 - 19:32

नेहा वर्मा, झी सारेगमप स्पर्धक 

 

सारेगमप जर्नी... अहह.. जर्नी नव्हेच सुखाचा आणि स्वप्नांचा प्रवास ह्या सगळ्या प्रवासाचा एका शब्दात वर्णन करायचा असेल तर 'अविस्मरणीया!!!!'

 

मी पार्टिसिपेट केलेला असा हा पहिलाच रिॅलिटी शो होता. कारण मुळात डेंटिस्ट्री शिकत असल्यामुळे तसा वेळही मिळाला नव्हता. इंटर्नशिप सुरू झाली आणि ऑडिशन्स च्या डेट्स अनाउन्स झाल्या. सारेगमाप मध्ये भाग घेणं हे प्रत्येक गायकाचं स्वप्न असतं किंवा हे स्वप्न घेऊनच आम्ही जगत असतो. त्यामुळे या साऱ्या गोष्टींबाबत खुपच उत्सुकता होती. पण जेवढं अपेक्षा केली होती त्यापेक्षा खूपच  जास्त आणि कधीहूी न विसरता येण्याजोगा असा हा सारा अनुभव होता.

 

अजय दादा आणि अतुल दादासमोर इतकी गाणी गायला मिळणं हे खरचं आमचं भाग्य म्हणावं लागेल.  आणि त्यांनी दिलेल्या टिप्स आजन्मा आमच्या कामी येतील ह्यात काहीच शंका नाही. जेव्हा टॉप फाइव मध्ये आले तेव्हाच माझ्यासाठी खरं तर स्पर्धा संपलेली.  कारण त्या ग्रँड फिनले च्या इव्हेंट मध्ये गाणं हीच खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळे सगळ्यांनी केलेली धम्माल, मजा, मस्ती याला तर काही सीमाच नव्हती.. जगण्यातला नवा अनुभव, नवी दिशा यातूनच जगणं काय असतं हे पण शिकता आलं.

 

आता नक्कीच जबाबदारी वाढली आहे. कारण ह्यापुढे आता अजुन चांगल गायचं आहे. सारेगमप मुळे आम्हाला आमची अशी एक ओळख नक्कीच मिळली. त्याचा आनंद तर आहेच पण त्यासोबत कर्तव्याची जाणीवसुद्धा झाली आहे.  ह्या पुढेही अजुन बराच काही करायचं आहे. सध्या काही शो सुरू आहेत. आता जे आम्ही टॉप फाइव स्पर्धक होतो, त्यांचासोबत अनेक शो करता येणार आहे. आणि सध्या त्यावरच काम सुरू आहे.  इतपर्यंता सगळ्यांचेच आशीर्वाद मिळाले. पुढेही सर्वांचेच आशीर्वाद पाठीशी असले तर नक्कीच अजुन खूप चांगलं काम करेन.

 

शब्दांकन- रोहित गोळे

First Published: Wednesday, December 28, 2011 - 19:32
comments powered by Disqus