स्वीमिंग पूलमध्ये सापडला रंजित यांच्या नोकराचा मृतदेह

बॉलिवूड अभिनेते रंजित यांच्या राहत्या बंगल्याजवळच्या स्विमिंग पूलमध्ये एका नोकराचा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 19, 2014, 02:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूड अभिनेते रंजित यांच्या राहत्या बंगल्याजवळच्या स्विमिंग पूलमध्ये एका नोकराचा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री हा मृतदेह आढळून आला. नागराज असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. नागराज गेल्या काही वर्षांपासून रंजित यांच्या घरी काम करत होता. तो ४२ वर्षांचा होता. तसंच नागराज याचं कुटुंबही बंगल्याच्या आवारातच राहत होतं.
गेल्या काही दिवसांपासून नागराज आजाराला तोंड देता होता. याच आजारपणाला कंटाळून नागराज यानं आपलं जीवन संपवलं असावं, असा कयास बांधला जातोय. नागराजनं याआधीही काही वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असं कुटुंबीयांनी म्हटलंय. याबाबत, जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.