दिया मिर्झाही होती ड्रग अॅडिक्ट...

`मीही ड्रग्ज अॅडिक्ट होते... वयाच्या केवळ नवव्या वर्षी मला अंमली पदार्थांच्या सेवनाची सवयच जडली होती` अशी कबुली दिलीय खुद्द अभिनेत्री दिया मिर्झा हिनं...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 3, 2014, 04:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रांची
`मीही ड्रग्ज अॅडिक्ट होते... वयाच्या केवळ नवव्या वर्षी मला अंमली पदार्थांच्या सेवनाची सवयच जडली होती` अशी कबुली दिलीय खुद्द अभिनेत्री दिया मिर्झा हिनं...
अभिनेत्री दीया मिर्झा रविवारी रांचीमध्ये होती. आयआयएम, रांचीच्या टेडेक्स २०१४ मध्ये तिची उपस्थिती हिरोईन म्हणून नाही तर शिक्षिका म्हणूनच जाणवली. याचवेळेस, एके काळी आपल्याला ड्रग्ज सेवनाची सवय होती, अशी कबुली देऊन उपस्थितांना चांगलाच धक्का दिला.
वयाच्या केवळ नवव्या वर्षी दिया ड्रग्जच्या आहारी गेली होती. वाईट संगतीमुळे तिला ही सवय लागली होती. परंतु, यावेळी तिला तिच्या आई-वडिलांनी सांभाळलं... आई-वडिलांची माया आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती या संकटातून वेळीच सावरली, असं दिया मिर्झा हिनं म्हटलंय. तिनं ड्रग्ज सेवन ही एक सवय नसून आजार असल्याचं म्हटलंय. नशा करणाऱ्या लोकांना हिणवून त्यांचा राग करू नका, त्याऐवजी त्यांची या आजारातून बाहेर पडण्यासाठी मदत करा, असा सल्लाही तिनं उपस्थितांना दिला.
टेडेक्स २०१४ या कार्यक्रात दियासोबतच बायोसेन्स टेक्नोलॉजीचे निर्माते मिस्किन इंगळे, अन्नपूर्णा परिवाराचे निर्माते डॉ. मेधा सामंत, लेखक अम्बी परमेश्वरन, म्युझिशिअन आणि व्होकलिस्ट विजयलक्ष्मी सुब्रह्मण्यम आणि माकपा नेत्या वृंदा करात यांसारखे अनेक प्रतिभावान व्यक्ती उपस्थित होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.