सलमानच्या उदारतेची `जय हो`!

`बिईंग ह्युमन` म्हणणाऱ्या सलमानच्या द्याळूपणाचा लाभ `जय हो`च्या टीमला झालाय. `जय हो` बॉक्स ऑफिसवर दणदणीत आदळल्यानंतरही चित्रपटाची टीम मात्र खूश आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 5, 2014, 12:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`बिईंग ह्युमन` म्हणणाऱ्या सलमानच्या उदारतेचा लाभ `जय हो`च्या टीमला झालाय. `जय हो` बॉक्स ऑफिसवर दणदणीत आदळल्यानंतरही चित्रपटाची टीम मात्र खूश आहे.
सलमान खान... अनेकांच्या गळ्यातला ताईत... अनेकांचा स्टार आयकॉन... बऱ्याचदा, चांगल्या आणि वाईट कारणांसाठी चर्चेत असणारा अभिनेता... ४८ वर्षांचा सलमान आजही `इंडियाज मोस्ट एलिजिबल बॅचलर्स`पैंकी एक ओळखला जातो. काळवीट शिकार प्रकरणी आणि एकाला गाडीनं उडवल्याप्रकरणी सध्या कोर्टाच्या फेऱ्या मारणारा सलमान त्याच्या `बिईंग ह्युमन` या स्वयंसेवी संस्थेच्या चांगल्या कामांमुळेही बऱ्याचदा वृत्तपत्रांची हेडलाईन बनतो. हाच सलमान आपल्या उदारतेसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे.
सिनेमांच्या दृष्टीनं २०१३ हे वर्ष सलमानसाठी काही फारसं चांगलं नव्हतं. यावर्षी त्याचा एकही सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला नव्हता. त्यामुळे, नुकत्याच रिलीज झालेल्या `जय हो`कडून त्याच्या फार अपेक्षा होत्या. पण, हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरलेला नाही. त्यानंतरही सलमान निराश झालेला नाही. बॉक्स ऑफिसवर आदळल्यानंतरही `जय हो`च्या टीमशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सलमाननं एक-एक लाखाचा चेक दिलाय.
सलमान खान या नावानंच सिनेमे चालतात, असं म्हटलं जातं. तेही काही खोटं नाही, हे सलमानचे याआधीच्या काही सिनेमांवर आणि त्यांच्या कमाईवर नजर टाकली तरी लक्षात येतं. `जय हो` आधी आलेल्या सलमानच्या पाच चित्रपटांनी चित्रपटगृहाचा पडदा व्यापून टाकला होता. प्रेक्षकांचं आपल्यावर प्रेम आहे हे सलमानला आता समजलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.