ऑस्करमध्ये `लाइफ ऑफ पाय`ची बाजी

हॉलिवूडमधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ८५ व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा झालेय. आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारांमध्ये `लाइफ ऑफ पाय` या चित्रपटाने तीन पुरस्कार मिळवीत बाजी मारली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 25, 2013, 10:25 AM IST

www.24taas.com,लॉसएंजिल्स्
हॉलिवूडमधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ८५ व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा झालेय. आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारांमध्ये `लाइफ ऑफ पाय` या चित्रपटाने तीन पुरस्कार मिळवीत बाजी मारली आहे.
ऑस्करच्या स्पर्धेत यंदा मराठी कलादिग्दर्शकाचे नाव झळकले आहे. दिलीप मोरे यांच्या `झिरो डार्क थर्टी` आणि `द बेस्ट एक्झॉरटिक मॅरिगोल्ड हॉटेल` या दोन हॉलिवूड सिनेमांना उत्कृष्ट कलादिग्दर्शनासाठी ऑस्करचे नामांकन मिळाले आहे. `झिरो डार्क थर्टी` हा सिनेमा दहशतवादी ओसामा बिन लादेन याला कसे ठार मारले, या विषयावर बेतलेला आहे.
`लाइफ ऑफ पाय` चित्रपटाला बेस्ट सिनेमेटोग्राफी, ओरिजनल स्कोर आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी पुरस्कार मिळाले आहेत. तर जँगो अन्चेन्ड चित्रपटातील भूमिकेसाठी खिस्तोफ वॉल्ट्झ याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा, तर ऍना हॅथवे हिला लेस मिजरेबल्स चित्रपटासाठी भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय.

ऑस्कर पुरस्कार
- साउंड एडिटिंग - झिरो डार्क थर्टी आणि स्कायफॉल
- बेस्ट साउंड मिक्सिंग - लेस मिजरेबल्स
- बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म - अमॉर (ऑस्ट्रिया)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - ख्रिस्तोफ वॉल्ट्झ (जँगो अनचेन्ड)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - ऍनी हॅथवे (लेस मिजरेबल्स)
- सर्वोत्कृष्ट डॉम्युमेंटरी - सर्चिंग फॉर शुगरमॅन
- अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - पेपरमॅन
- अॅनिमेटेड फिचर फिल्म - ब्रेव्ह
- सिनेमॅटोग्राफी, व्हिज्युअल इफेक्ट्स - लाइफ ऑफ पाय
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा - ऍना कारीनिना
- मेकअप आणि हेअरस्टाईल - लेस मिसरेब्लेस
- लाईव्ह ऍक्शन शॉर्ट - कर्फ्यू
- बेस्ट डॉक्युमेंटरी (शॉर्ट सब्जेक्ट) - इनोसेन्ट
- बेस्ट फिल्म एडिटिंग - विल्यम गोल्डनबर्ग (आर्गो)
- बेस्ट प्रॉडक्शन डिजाईन - लिंकन
- ओरिजनल स्कोर - मायकल डॅना (लाइफ ऑफ पाय)
- बेस्ट ओरिजनल साँग - ऍडल ऍडकिन्स, पॉल अपवर्थ (स्कायफॉल)
- बेस्ट एडाप्टेड स्क्रिनप्ले - ख्रिस टेरिओ (आर्गो)
- बेस्ट ओरिजनल स्क्रिनप्ले - क्वान्टीन टेरँटिनो (जँगो अन्चेन्ड)