पुण्याच्या गुप्तहेराचा `पुणे ५२`

श्रीरंग गोडबोले यांच्या इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्स आणि अरभाट निर्मिती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे 52’ या चित्रपटाची घोषणा यावेळी करण्यात आली. ही सिनेमा एका गुप्तहेराच्या हेरकथेवर आधारित आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 17, 2012, 04:18 PM IST

www.24taas.com, पुणे
श्रीरंग गोडबोले यांच्या इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्स आणि अरभाट निर्मिती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे 52’ या चित्रपटाची घोषणा यावेळी करण्यात आली. ही सिनेमा एका गुप्तहेराच्या हेरकथेवर आधारित आहे.
या सिनेमाची कथा इतर मराठी सिनेमांहून वेगळी आहे. १९९२ साली पुण्यात काम करणाऱ्या एका खासगी गुप्तहेराच्या आयुष्यावर ही कथा आहे. ऑस्ट्रेलियातील ‘सिडनी फिल्म स्कूलचे’ माजी विद्यार्थी असणारे निखिल महाजन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.या सिनेमाचं बजेट २.५ ते ३ कोटी रुपये एवढं आहे.
या सिनेमात गिरिश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, भारती आचरेकर, किरण करमरकर इत्यादी कलाकार आहेत. या सिनेमासाठी विदेशी तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञांची मदत घेण्यात आली आहे. १२ डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.