फिल्म रिव्ह्यूः रामलीलाः रोमान्सची अद्भूत रासलीला

अनेक वादांच्या पार्श्वभूमीवर अखेर रामालीला हा चित्रपट आज रिलीज झाला. दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की ते खरोखर मोठ्या पडद्याचे जादूगार आहेत.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 15, 2013, 09:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अनेक वादांच्या पार्श्वभूमीवर अखेर रामालीला हा चित्रपट आज रिलीज झाला. दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की ते खरोखर मोठ्या पडद्याचे जादूगार आहेत. या चित्रपटातील ऍक्शन सिक्वेन्स जबरदस्त झाले आहेत तर दुसरीकडे रोमान्स हा प्रेक्षकांना एक टक पाहण्याला विवश करतो आहे.
संजय लीला भंसाळी यांनी आपल्या सफाईदार दिग्दर्शनाची चुणूक दाखवली आहे. त्यामुळेच त्यांनी त्यांना फिल्मी जादूगार का म्हणतात हे सिद्ध केले आहे. या चित्रपटाची कथा कोणत्या ढंगात सादर करणे, कोणत्या रंगात रंगविणे आणि कोणत्या दिशेला वळवणे हे भंसाळी यांनी खरोखऱ माहित आहे. ते या चित्रपटात त्यांनी आपली खासियत या चित्रपटात दाखवली आहे. या चित्रपटातील विषय काही नवा नाही, पण कथा आणि ट्रिटमेंट वेगळ्या अंदाजात मांडली आहे.
चित्रपटाची कथा शेक्सपीअरच्या रोमिओ-ज्युलिएटवरून प्रेरित आहे. चित्रपटाची कथा सुरू होते गुजरातच्या कच्छ गावाची आहे. या ठिकाणी अवैधरित्या हत्यारे बनविले आणि विकले जातात. गावातील दोन घराण्यांमध्ये कट्टर दुश्मनी आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर गोळीबार आणि खून होत असतो. या दोन्ही घराण्यात राम (रणवीर सिंह) आणि लीला (दीपिका पदुकोण) यांचं सूत जुळतं. परिस्थिती त्यांना एकमेकांपासून दूर करते आणि त्यांचा गैरसमजाचे जाळं विणलं जातं. नंतर हे दोघे आपल्या घऱाण्यातील प्रमुख बनतात आणि एक दुसऱ्या विरुद्ध कारवाया करतात. आणि शेवटी रोमियो ज्युलिएटप्रमाणे एक दुसऱ्याला..... हे आम्ही सांगणार नाही. ते तुम्ही प्रत्यक्ष पडद्यावर पाहा.
संजय लीला भंसाळी यांनी चित्रपटाची सुरूवात चांगली केली आहे. रणवीर आणि दीपिकाचे सुरूवातीचे सीन हे चित्रपटाचे प्राण आहेत. चित्रपटात काही ठिकाणी संवाद हे डबल मिनिंगचे आहेत. त्यात फिगर पे मत जा, ट्रिगर दबा दुंगी. काही ठिकाणी रोमान्सच्या सीन्सची मागणी पाहता, जबरदस्ती घुसवले आहेत. परंतु, अभिनयाच्या बाबतीत दीपिकाने रणवीराला मागे टाकले आहे. तीने आपल्या अभिनय आणि सौंदर्याने सर्वांचे मन जिंकले आहे.
गुजराती मुलीची भूमिका दीपिकाने चांगली वढवली आहे. रणवीर सिंह कुठेकुठे कमकुवत वाटलेला दिसतो. एकूण काय तर हा चित्रपट अक्शन आणि रोमान्सच्या विविध रंगात रंगला आहे, त्यामुळे हा एकदा तरी आपण पाहिला पाहिजे.

 
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.