राणी मुखर्जीने उडवून दिला लग्नाचा बार

अभिनेत्री राणी मुखर्जीने लग्नाचा बार उडवून दिल्याची बातमी आहे. तेव्हा राणीला `ये क्यो बोलती तू` असं म्हणून विचारू नका, राणी मुखर्जीने तसा लग्नाला उशीर केल्यामुळे फारसे चाहते नाराज होणार नाहीत.

Updated: Apr 22, 2014, 11:23 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री राणी मुखर्जीने लग्नाचा बार उडवून दिल्याची बातमी आहे. तेव्हा राणीला `ये क्यो बोलती तू` असं म्हणून विचारू नका, राणी मुखर्जीने तसा लग्नाला उशीर केल्यामुळे फारसे चाहते नाराज होणार नाहीत.
मात्र राणीने उशीरा का असे ना कुर्यात सदा मंगलम केल्याने सर्वांना हायसं वाटलंय.
राणी मुखर्जीने कुणाशी लग्न केलं, हा औत्सुक्याचा आणि महत्वाचा भाग आहे.
राणी मुखर्जीने यशराज फिल्म्सचे आदित्य चोप्रा यांच्याशी लग्न केल्याची चर्चा आहे.
यशराज फिल्म्सचा एक मेसेजही सध्या व्हॉटस अॅपवर फिरतोय. राणी मुखर्जीची यावर अजून प्रतिक्रिया आलेली नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.