‘सारा सैफ अली खान’ची बॉलिवूड एन्ट्री!

By Shubhangi Palve | Last Updated: Sunday, August 19, 2012 - 15:52

24taas.com, नवी दिल्ली
करिना कपूरसोबत येत्या काही दिवसांत विवाहाच्या बंधनात अडकण्याची स्वप्न सैफ अली खान सध्या रंगवताना दिसतोय. पण, त्याची मुलगी स्वप्न पाहतेय ती बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याची...
बॉलिवूडमध्ये लवकरच प्रवेश करणाऱ्या ‘न्यू-कमर्स’मध्ये आता आणखी एका फ्रेश चेहऱ्याची भर पडतेय, ती म्हणजे सारा अली खान हिची... पतौडी नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी म्हणजे सारा खान... खुद्द अमृता सिंग हीनंच आपल्या १६ वर्षांच्या साराच्या फिल्मी करिअरला सुरुवात करण्यासाठी यश राज बॅनरची वाट धरलीय. त्यामुळे आता सारा खान यशराज फिल्म बॅनरखाली आपल्या अॅक्टिंग करिअरला सुरूवात करणार आहे.
नुकतीच सारा ही ‘लाईफस्टाईल’ मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकली होती. तेव्हापासून तिला अॅक्टींगसाठी ऑफर यायची सुरुवात झालीय. पण, अमृताला मात्र आपल्या मुलीनं अशा-तशा प्रोडक्शन हाऊसपासून सुरुवात करावी हे खचितच पटणारं नव्हतं. त्यामुळे तिनं थेट यश राज फिल्म्सशी संपर्क साधला.
यशराज फिल्म्सकडूनही साराला सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे अमृता मात्र भलतीच खूश आहे.First Published: Sunday, August 19, 2012 - 14:44


comments powered by Disqus