ऑस्ट्रेलियाचा अॅशेस मालिकेवर ३-० ने कब्जा

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा १५० धावांनी पराभव करत अॅशेस मालिकेवर कब्जा केलाय. ऑस्ट्रेलियाने २००६-२००७ नंतर पुन्हा एकदा ही मालिका आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 17, 2013, 12:36 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, पर्थ
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा १५० धावांनी पराभव करत अॅशेस मालिकेवर कब्जा केलाय. ऑस्ट्रेलियाने २००६-२००७ नंतर पुन्हा एकदा ही मालिका आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मिशेल जॉन्सनच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडचा दुसरा डाव मंगळवारी अखेरच्या दिवशी ३५३ धावांत संपुष्टात आला. स्टिव्हन स्मिथ याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
आज सकाळी ऑस्ट्रेलियाला अॅशेस मालिका राखण्यासाठी फक्त पाच विकेट्‌स हव्या होत्या. वाका खेळपट्टीवर चौथ्या दिवशी झटपट विकेट गेल्यात. ५०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या बेन स्ट्रोक्सने शतक झळकाविण्याची कामगिरी केली. पहिल्यांदाज अॅशेसमध्ये खेळत असलेल्या स्ट्रोक्सच्या शतकामुळे इंग्लंडचा पराभव लांबला. मात्र, लंचनंतर ऑस्ट्रेलियाचा डाव ३५३ धावांत संपुष्टात आला.
पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे या सामन्यातही जॉन्सनने जोरदार मारा करत दुसऱ्या डावात इंग्लंडचे चार फलंदाज बाद केले. जॉन्सनने अँडरसनला बाद करत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. त्यापूर्वी, चौथ्या दिवशी सलग तिसऱ्या कसोटीत पाचशेहून अधिक धावांचे आव्हान मिळाल्यानंतर इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरवात सनसनाटी झाली. कर्णधार ऍलिस्टक कुक शून्यावर बाद झाला. त्यानंतर कॅरबेरी आणि ज्यो रूट यांनी ६२ धावा केल्या.
पीटरसनला फिरकीवर हवेतून फटका मारण्याची घाई महागात पडली. अशा वेळी इयान बेलला बेन स्टोक्‍सची साथ मिळाली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी केलेल्या ९९ धावांच्या भागीदारीनेच इंग्लंडला चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखता आले. दिवस अखेरीस सिडलने बेलची (६०) विकेट मिळविली.
चौथ्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलियाने १७ षटकांत १३४ धावांची भर घातली. तिसऱ्या दिवस अखेरच्या ३ बाद २३५ धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरवात केल्यावर नाबाद फलंदाज शेन वॉटसन याने ग्रॅमी स्वानच्या पहिल्याच षटकांत दोन चौकार आणि एक षटकार ठोकून चांगली सुरूवात केली. त्याने चौथे कसोटी शतक साजरे करताना आज ४० चेंडूत ७४ धावांची भर घातली. वॉटसन धावबाद होऊन परतला. तेव्हा त्याने १०८ चेंडूंत ११ चौकार, ५ षटकारांसह १०३ धावा केल्या. बेलीच्या फटकेबाजीनंतर मायकेक क्‍लार्कने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ६ बाद ३६९ धावसंख्येवर घोषित केला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.