उत्तरकाशीत लोकांचे हाल, BCCI करतेय खेळाडूंना मालामाल!

भारतातली सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था असलेल्या बीसीसीआयची असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघड झाली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 24, 2013, 07:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतातली सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था असलेल्या बीसीसीआयची असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघड झाली आहे.
भारतीय टीमनं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर बीसीसीआयनं प्रत्येक खेळाडूला तब्बल एक कोटीचं पारितोषिक दिलं. तर सपोर्टिंग स्टाफला प्रत्येकी ३० लाख रुपयांचं घसघशीत बक्षीस दिलंय. बक्षिसावर कोट्यवधी रुपये उधळणा-या बीसीसीआयला मात्र उत्तराखंडचा आक्रोश पाहून पाझर फुटलेला नाही.
अनेक संस्था, उद्योगपती, लोकप्रतिनिधी आपापल्यापरीनं मदत देत असताना बीसीसीआयनं मात्र कोणत्याही प्रकारची मदत उत्तराखंडच्या महापुरात बाधित झालेल्या देशवासीयांना दिलेली नाही. विशेष म्हणजे शिखर धवननं आपल्या पुरस्काराची रक्कम उत्तराखंडला बहाल केल्यानंतरही गेंड्याची कातडी पांघरलेल्या बीसीसीआयला मतदतीच्या घोषणेची करावीशी वाटली नाही.
भारतीयांमध्ये क्रिकेटची लोकप्रियता अफाट आहे. या लोकप्रियतेच्या म्हणजेच देशवासियांच्या क्रिकेटवरील प्रेमामुळं बीसीसीआय दरवर्षी हजारो कोटींची कमाई करते. विविध राज्यांमधील हेच देशवासीय उत्तराखंडमध्ये संकटात सापडलेले असताना बीसीसीआयनं मात्र त्यांच्या प्रती निष्ठुरपणा दाखवलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.