फिव्हर असताना पोलार्ड ठरला गोलंदाजांचा कर्दनकाळ

आक्रमक ख्रिस गेलचा कित्ता मुंबई इंडियन्सचा किरॉन पोलार्ड यांने ‘दे घुमाके’ करत काल गिरवला. तो तापाने फणफणत असताना मुंबई इंडियन्स टीमच्या विजयासाठी धाऊन आला आणि फोर, सिक्सचा धुमधडाका वानखेडवर दाखवून दिला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 14, 2013, 04:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आक्रमक ख्रिस गेलचा कित्ता मुंबई इंडियन्सचा किरॉन पोलार्ड यांने ‘दे घुमाके’ करत काल गिरवला. तो तापाने फणफणत असताना मुंबई इंडियन्स टीमच्या विजयासाठी धाऊन आला आणि फोर, सिक्सचा धुमधडाका वानखेडवर दाखवून दिला.
किरॉन पोलार्ड याने आक्रमक खेळी करताना एकट्याच्या ताकदीवर सनराइजर्स हैदराबाद टीमवर मात केली. पोलार्डने ८ सिक्स आणि दोन फोरच्या मदतीने २७ बॉलमध्ये ६६ रन्स केले.

किरॉन पोलार्ड याला स्वत:ला ताप आलेला होता. त्यामुळे तो आयपीएल सामन्यात खेळेल की नाही, याबाबत काहीही माहित नव्हते. तो तापाने फणफणत होता. मात्र, मुंबई इंडियन्स संघ संकटात सापडलेला असताना तो मैदानात आला आणि सर्व खेळच पलटून टाकला.
पोलार्डने वानखेडेवरील सामन्याबाबत पत्रकार परिषदेत सांगितले की, मला प्रचंड ताप आला होता. खुप शिंकाही येत होत्या. पुणे वॉरियसबरोबर खेळताना मी टीममध्ये नव्हतो. मला बरं वाटत नव्हतं. त्यामुळे सनराइजर्स हैदराबादबरोबच्या सामन्यात खेळन की नाही, याबाबत शंका होती. मी काल सामना पाहायला आलो होतो. संघाला माझी गरज आहे, याची मला जाणीव झाली. मी मैदानात त्यासाठी उतरलो आणि चांगली फटकेबाजी केली, असे पोलार्ड यांने स्पष्ट केले.

आपल्याला वाटत असेल की आपण चांगले खेळू तेव्हाच आपण खेळण्यास फिट आहे, असे पोलार्ड सांगतो. संघ व्यवस्थापकने मला खेळण्यास सांगितले. सामना किती महत्वाचा होता, हे लक्षात आले. त्यानंतर मी मैदानात उतरलो. ९९ रन्सवर मुंबईचे तीन विकेट गेल्या. ४० बॉलमध्ये ८० रन्सची गरज होती. त्यावेळी मी फटकेबाजी केली.
मी १३ व्या ओव्हरमध्ये खेळण्यास आलो. दोन बॉल निर्धाव गेले. त्यानंतर प्रत्येक ओव्हरमध्ये १५ रन्सची गरज होती. मला लक्ष्य गाठायचे होते. त्यामुळे मी ठरवले की, बॉलरची धुलाई करायची. त्यानुसार मी ते केले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.