टीम इंडिया गडगडली, सचिन झाला पुन्हा एकदा बोल्ड

भारतानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर आजपासून भारत विरूद्ध इंग्लड दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे.

Updated: Nov 24, 2012, 03:45 PM IST

www.24taas.com, मुंबई
टॉस जिंकून भारताने प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय भारताच्या अगंलट येणार असंच दिसते आहे. इंग्लंडच्या स्पिर्नसने भारताला अडचणीत आणायला सुरुवात केली. ४३ चेंडूत चार चौकारासह ३० धावावर खेळणा-या सेहवागला त्याने चकवत त्रिफळाचित केले. त्यानंतर त्याच्या जागेवर आलेल्या सचिन तेंडुलकरला त्याने स्थिरावून दिले नाही. त्यालाही केवळ ८ धावावर पानेसरने त्रिफळाचित केले.
भारतानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर आजपासून भारत विरूद्ध इंग्लड दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. भारताने ५ षटकात १ बाद ११ धावा केल्या आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि चेतेश्वर पुजारा खेळत आहेत.
गौतम गंभीर आज ४ धावांवर जेम्स अंडरसनच्या गोलंदाजीवर पायचित झाला. दरम्यान, आपला १०० वा कसोटी सामना खेळणा-या सेहवागने आज चौकाराने सुरुवात केली. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने तीन फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे. ऑफस्पिनर हरभजनसिंगला संघात घेण्यात आले आहे.
मागील कसोटीत चांगली कामगिरी करणा-या अश्विन-ओझा जोडी कायम ठेवत धोनीने हरभजनलाही या कसोटीत संधी दिली आहे. भज्जीची ही ९९ वी कसोटी आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादव जखमी झाल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे.