`आयपीएल` तुमच्यासाठी कायपण....

चारशे वर्षातल्या भीषण दुष्काळामुळं आदिवासींवर भीक मागून खाण्याची वेळ आली असताना पुरोगामी महाराष्ट्रातच आयपीएलचा घाट घातला जातोय.

Updated: Apr 2, 2013, 04:12 PM IST

www.24taas.com, मुंबई
चारशे वर्षातल्या भीषण दुष्काळामुळं आदिवासींवर भीक मागून खाण्याची वेळ आली असताना पुरोगामी महाराष्ट्रातच आयपीएलचा घाट घातला जातोय. दुष्काळामुळं रोजगार नसलेल्या आदिवासी बांधवांना जगण्यासाठी भाकरीच्या शिळ्या तुकड्यांवर पोट भरावं लागतयं.
दुसरीकडं त्याच राज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये क्रिकेट आणि करमणुकीच्या नावाखाली पाण्याची उधळपट्टी होतेय. शिवाय श्रीमंतीचा बडेजाव मिरवला जातोय. दुष्काळामुळं राज्यातला शेतकरी देशोधडीला लागलाय. खरीपाच्या पाठोपाठ रब्बीचंही पिक हातचं गेल्यानं शेतकरी कंगाल झालाय.
शेतमजूर म्हणून काम करणा-या आदिवासींवरही भीक मागण्याची वेळ आलीये. दुष्काळ फक्त शेतकरी किंवा एका समाज घटकापुरता मर्यादित राहिला नसून दुष्काळाचे सर्वव्यापी परिणाम दिसू लागलेत.