महिलेचे लैंगिक शोषण, पाक संघाच्या मसाजरची हकालपट्टी

By Prashant Jadhav | Last Updated: Thursday, July 4, 2013 - 14:58

www.24taas.com, झी मीडिया, कराची
एका महिलेचे शारिरीक शोषण केल्याच्या आरोपावरून पाक संघाच्या खेळाडूंना मसाज करणाऱ्या मलंग अली याला चँपियन्स ट्रॉफी दरम्यान पाकला पाठविण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. स्पर्धा सुरू असताना लंडनच्या एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. यानंतर अली याची पत्नी पाकिस्तानमध्ये आजारी असल्याचे कारण दाखवून त्याला परत धाडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मलंग अली याने हॉटेलमधील एका महिला कर्मचाऱ्याचे शारीरिक शोषण केल्याचे हॉटेल व्यवस्थापनाने संघास कळविले. त्यावर संघ व्यवस्थापनाने केलेल्या चौकशीमध्ये अली दोषी आढळल्याने त्याला मायदेशात परत पाठविण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मायदेशी परत गेल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने अली याला कामावरूनही काढून टाकले. मात्र, पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रवक्ते नदीम सरवर यांनी अली याची बदली करण्यात आल्याचा दावा केला आहे.
याआधी मलेशिया येथे झालेल्या युवक विश्वआकरंडक स्पर्धेतही अली याने एका खेळाडूच्या रूममधून चोरी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, July 4, 2013 - 14:58
comments powered by Disqus