रवींद्र जडेजा बॉलिंगमध्ये अव्वल, विराटची पाचमध्ये झेप

भारतीय संघाचा स्पीनर रवींद्र जडेजाने वेस्ट इंडीजच्या सुनील नारायणसह आयसीसी वनडेमध्ये बॉलिंगच्या क्रमवारीतील अव्वल स्थान पटकाविले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने आणखी सुधारणा करताना चौथ्या स्थानावर उडी घेतली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 18, 2013, 09:01 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, दुबई
भारतीय संघाचा स्पीनर रवींद्र जडेजाने वेस्ट इंडीजच्या सुनील नारायणसह आयसीसी वनडेमध्ये बॉलिंगच्या क्रमवारीतील अव्वल स्थान पटकाविले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने आणखी सुधारणा करताना चौथ्या स्थानावर उडी घेतली आहे.
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपले सातवे स्थान कायम राखले असून, सुरेश रैना संयुक्तरीत्या १६व्या स्थानी आहे. बॉलर आर. आश्विमन १८व्या तर भुवनेश्व्रकुमार २० व्या स्थानावर आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा हाशीम आमला हा प्रथम स्थानावर आहे. इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी केलेला ऑस्ट्रेलियाचा मिशेल जॉन्सनने आठ स्थानावरून सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा चौथ्या स्थानावर गेला. तर शेन वॉटसन दोन स्थानांची सुधारणा करून तिसऱ्या स्थानी आला आहे. पाकिस्तानचा महंमद हाफीज याने आपले पहिले स्थान कायम राखले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.