भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी रवाना

भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी रविवारी सकाळी बांगलादेशला रवाना झाला. स्पर्धची सुरुवात २५ फ्रेबुवारीपासून होणार आहे.

Updated: Feb 23, 2014, 02:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी रविवारी सकाळी बांगलादेशला रवाना झाला. स्पर्धची सुरुवात २५ फ्रेबुवारीपासून होणार आहे.
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीला न्यूझीलंड विरुद्ध सामान्यात दुखापत झाली होती. म्हणून या स्पर्धेमध्ये विराट कोहली संघाचे नेतृत्व करणार आहे.
भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध २६ फ्रेबुवारीला होणार आहे. तसेच २८ फ्रेबुवारीला श्रीलंकेविरुद्ध, ०२ मार्चला पाकिस्तानविरुद्ध, आणि ०५ मार्चला अफगणिस्तानविरुद्ध सामने होणार असून, ०८ मार्चला अंतिम सामना होणार आहे.
आतापर्यंत भारताने आशिया चषक स्पर्धा पाचवेळा जिंकली आहे. भारताला शेवटचे विजेतेपद २०१० मध्ये श्रीलंकेत झालेल्या आशिया चषक स्पर्धामध्ये मिळवले होते.
न्यूझीलंड दौ-यात झालेल्या दारुण पराभवमुळे आशिया चषक स्पर्धाचे विजेतेपद मिळवण्यासाठी, भारतीय संघाला कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत.
भारतीय संघाची यादी : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शिखर धवन, दिनेश कार्तिक, आर.अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहोम्मद शामी, चेतेश्र्वर पुजारा, भुवनेश्र्वर कुमार, स्टुअर्ट बिन्नी, वरुण अॅरॉन, ईश्र्वर पांडे, अमित मिश्रा आणि अंबाती रायडू.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.