कांगारुंकडे २३० रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी

बॉक्सिंग-डे टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियानं ८ विकेट्स गमावून १७९ रन्स केले आहेत. कांगारुंकडे २३० रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी आहे. माईक हसी ७९ रन्सवर आणि जेम्स पॅटिनसन शून्यावर नॉटआऊट आहे.

Updated: Dec 28, 2011, 01:07 PM IST

झी २४ तास वेब टीम, मेलबर्न

 

बॉक्सिंग-डे टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियानं ८ विकेट्स गमावून १७९ रन्स केले आहेत. कांगारुंकडे २३० रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी आहे. माईक हसी ७९ रन्सवर आणि जेम्स पॅटिनसन शून्यावर नॉटआऊट आहे. रिकी पॉन्टिंग आणि माईक हसीच्या हाफ सेंच्युरीजच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला १७९ रन्सपर्यंत मजल मारता आली. अनुभवी माईक हसी आणि रिकी पॉन्टिंगनं कांगारुंची इनिंग सावरली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ११५ रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली. भारताकडून उमेश यादवनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर झहीर खाननं दोन विकेट्स घेतल्या. ईशांत शर्मा आणि आर. अश्विननं प्रत्येकी एकेक विकेट घेतली.  आता टेस्टच्या चौथ्या दिवशी कांगारुंच्या उर्वरित दोन विकेट्स झटपट घेण्यावर टीम इंडियाचा भर राहील.

 

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

 

ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का बसला असून आर अश्विनच्या बॉलिंगवर एन एम लॉयन पायचित झाला होता.  एकही धाव न काढता लॉयनला परत पाठवण्यात अश्विनला यश आलं . त्यानंतर पॅटिन्सन 'हसी'ला साथ द्यायला मैदानात आला.  यापूर्वी बी जे हडिन ४ रन्स काढून आऊट झाला. झहीरने टाकलेल्या बॉलवर लक्ष्मणने हडिनचा झेल टिपला. त्यामुळे पॉन्टिंग पाठोपाठ हडिनही आऊट झाला होता.

 

बॉक्सिंग-डे टेस्ट मॅचमध्ये टीम इंडिया २८२ रन्सवर ऑलआऊट झाली होती. कांगारुंना ५१ रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. बेन हिलफेनहॉसच्या फास्ट बॉलिंगची जादू  चांगलीच चालली. त्यानं भारतीय बॅट्समनना रन्स काढण्याची कुठलीही संधी दिली नाही. त्यांना मॅचमध्ये सर्वाधिक पाच विकेट्स घेण्याची किमया केली.  भारताकडून सचिन तेंडुलकरनं ७३ केले. तर सेहवागनं ६७ रन्सची इनिंग खेळली. सचिन आणि सेहवागची सेंच्युरी हुकली तरी द्रविड यावेळी सेंच्युरी करेल अशी आशाही फोलच ठरली. मात्र, द्रविडने ६८ रन्सवर आऊट झाला.  या तिंघांव्यतिरिक्त भारताच्या एकाही बॅट्समनला फारशी कमाल करता आली नाही.