'टीम इंडिया'तील वाद 'रोटेशन पॉलिसी'मुळे

टीम इंडियात वाद फक्त सिनियर्स प्लेअर्सच्या फिल्डिंगबाबत धोनीनं केलेल्या वादग्रस्त विधानामुळेच नाही तर रोटेशन पॉलिसीवरूनही आहे. वीरूनं धोनीच्या रोटेशन पॉलिसवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.

Updated: Feb 22, 2012, 06:22 PM IST

www.24taas.com, ब्रिस्बेन

 

टीम इंडियात वाद फक्त सिनियर्स प्लेअर्सच्या फिल्डिंगबाबत धोनीनं केलेल्या वादग्रस्त विधानामुळेच नाही तर रोटेशन पॉलिसीवरूनही आहे. वीरूनं धोनीच्या रोटेशन पॉलिसवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. सेहवागनं आपण पूर्णपणे फिट असल्याच सांगताना आपल्या प्लेईंग इलेव्हनबाहेर ठेवण्याचा निर्णय कॅप्टनचाच असल्याच स्पष्ट केलंय. इतकंच नाही तर टीमचं नेतृत्व आल्यानंतर रोहितला टीमबाहेर ठेवून वीरूनं धोनीवर पलटवार केलाय.

 

आतापर्यंत ही लढाई पडद्यामागे  होती. मात्र आता सिनियर्स आणि धोनीमधील वाद जगासमोर आलाय. टीम इंडिया कॅप्टन आणि वाईट कॅप्टनमधील वाद ही आता चर्चा नसून वास्तव आहे. धोनी सतत सांगत होता की रोटेशन पॉलिसीबाबत टीममध्ये एकमत आहे. सेहवागला प्लेईंग इलेव्हनमध्ये न खेळवण्याबाबत तो अनफिट असल्याच कारण माहीनं दिलं होतं. मात्र वीरूनं धोनीचे सर्व कारणं धुडकावून लावलीय.

 

वीरू एवढ्यावरच थांबला नाही तर नेतृत्व आल्याबरोबर त्यानं धोनीच्या रोटेशन पॉलिसीतही फेरबदल केले. खराब कामगिरीनंतरही टीममध्ये असलेल्या रोहितला प्लेईंग इलेव्हनमधून डच्चू दिला आणि रोटेशन पॉलिसी केवळ सीनियर्ससाठीच नसल्याचा इशाराच त्यानं दिला. एकमेकांवर वार आणि पलटवार करताना धोनी आणि  सीनियर्समधील रोटेशन पॉलिवरून वाद आता शिगेला पोहचल्याचंच हे द्योतक आहे.