देवशी खंडुरीचा नवा आयटम बॉम्ब

बॉलीवूडची फुलझडी देवशी खंडुरीने दिवाळी आधीच धमाका उडवून दिला आहे. तिने चक्क अंगवार फटाक्यांचीच वस्त्रं परिधान केली आहेत. ही बया एवढ्यावर न थांबता बोल्ड फोटोशूटही केलं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 12, 2012, 08:39 AM IST

www.24taas.com,मुंबई
बॉलीवूडची फुलझडी देवशी खंडुरीने दिवाळी आधीच धमाका उडवून दिला आहे. तिने चक्क अंगवार फटाक्यांचीच वस्त्रं परिधान केली आहेत. ही बया एवढ्यावर न थांबता बोल्ड फोटोशूटही केलं.
प्रकाशाचा सण दिवाळी. दिवाळीत फटाके फोडले जातात. मात्र, देवशी खंडुरीने दिवाळी आधीच फटाके फोडले आहेत. दिवाळी साजरी करण्यासाठी देवशीने अगदी खास गिफ्ट तेही फटाक्यांच. ज्याचं नाव आहे ‘देवशी बॉम्ब’. त्यासाठी तिने खास स्पेशल हॉट, बोल्ड आणि सिझलिंग फोटोशूट केलं म्हणे.
देवशी फटाकडीने चक्क अंगावर दागिन्याप्रमाणे फटाके घातले होते. याबद्दल ही बी-टाऊनची रॉकेट बॉम्ब म्हणाली की, मला सरप्राइज द्यायला फारच आवडते. ते मला माझ्या चाहत्यांना आणि मित्रांना द्यायचं होत, असंच स्पेशल गिफ्ट.