उठा उठा सकळीक, दिवाळी आली!
दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशीचा. याला अनेक ठिकाणी `धनतरस` असंही म्हटलं जातं. दीपावलीच्या दिवशी लोक धनाची म्हणजेच लक्ष्मीची पूजा करतात. ताम्हणात वाटी किंवा पाटावर नाणी ठेवून त्याची हळद-कुंकू वाहून ही पूजा केली जाते. धणे, गूळ एकत्र करून त्याचा प्रसाद वाटला जातो.
ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक - बीबीसी
महाराष्ट्र राजकारणात दशकापासून बाळ ठाकरे यांचा दबदबा होता. ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते, त्यांचा महाराष्ट्राबरोबच खास करून मुंबईवर मोठा प्रभाव होता, असे बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
अंतराळरवीर सुनीता विल्सम्सकडून दिवाळीच्या शुभेच्छा
अवकाशात सहा महिन्यांपेक्षा जास्त वास्तव्य करणारी भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिने प्रकाशाचा उत्सव दिवाळीनिमित्ताने भारतीयांना शुभेच्छा दिल्यात.
लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी करा मंगल स्नान....
अश्विन शुध्द कोजागिरी पौर्णिमा येते. हिवाळयाची चाहूल लागते. शरदातील चांदणे तनमन सुखावून जाते. अश्या वातावरणात हळूच पाऊल टाकत येते दिवाळी!
आनंदवनाकडून दिवाळीची शुभेच्छापत्रं
इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात स्वतः तयार केलेल्या शुभेच्छांचं महत्त्व कमी झालेलं दिसतं, पण चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन सेवा प्रकल्पातले अपंग आणि कुष्टरोगी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रिटींग्स बनवतात.
दीपावलीनिमित्त बेटी बचावचा संदेश
दीपावलीनिमित्त नाशिकमध्ये सर्वात मोठा आकाशकंदील तयार करण्यात आलाय. तर भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीनं दीपोत्सव साजरा केलाय. त्यांनी यातून बेटी बचावचा संदेश दिला आहे.
देवशी खंडुरीचा नवा आयटम बॉम्ब
बॉलीवूडची फुलझडी देवशी खंडुरीने दिवाळी आधीच धमाका उडवून दिला आहे. तिने चक्क अंगवार फटाक्यांचीच वस्त्रं परिधान केली आहेत. ही बया एवढ्यावर न थांबता बोल्ड फोटोशूटही केलं.
आज धनत्रयोदशी, चोपड्यांची पूजा
आज धनत्रयोदशी, दिवाळीचा पहिला दिवस. आजच्या मुहूर्तावर जमाखर्चाच्या वह्यांची खरेदी केली जाते. व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्या म्हणजेच चोपड्यांची पूजा करतात. तसंच धनाचीही पूजी केली जाते.
दिवाळीचा चविष्ठ साहित्यिक फराळ...
दिवाळीच्या आकर्षक साहित्यांनी बाजारपेठा फुलल्या असताना वाचकांसाठी दिवाळीची साहित्यिक भेट म्हणजेच दिवाळी अंक वाचकांसाठी तायर झालेत.
मराठी ग्रिटींग्स्... भावना पोहचवण्याचं साधन!
आपल्या मनातल्या शुभेच्छा आपल्या आवडत्या व्यक्तींपर्यंत पोहचवण्याचं आणखी एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे भेटकार्ड अर्थातच ग्रीटींग कार्डस्. खास दिवाळीसाठी सध्या बाजारात मराठी ग्रीटींग्सही उपलब्ध आहेत.
कोल्हापूरमध्ये अनोख्या पणत्या
दिवाळ सणासाठी कोल्हापूरनगरी सज्ज झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात इतर साहित्यासह सध्या नावीन्यपूर्ण आणि आकर्षक पणत्याही उपलब्ध आहेत. पण दिसायला अधिक आकर्षक, टिकाऊ आणि न गळणाऱ्या पणत्या बाजारात मिळाल्या तर?.... कोल्हापूरातील अशा पणत्या उपलब्ध आहेत
बिग बीच्या घरी दिवाळीला २०० कंदील
अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या घरी यंदाची दिवाळी मोठी असणार आहे. यासाठी बच्चन यांनी ठाण्यातल्या कैलास देसले यांच्याकडं २०० आकाश कंदीलांची ऑर्डर नोंदवलीय. इको फ्रेंडली कंदील बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे.
ठाण्यात माव्यात भेसळ, पाच ठिकाणी धाड
दिवाळीच्या तोंडावर ठाण्यात एफडीएने पाच ठिकाणी छापे टाकून बारा लाखांचा मावा जप्त करण्यात आला आहे. हा मावा भेसळयुक्त असल्याचे पुढे आले आहे.
दिवाळीमध्ये नागपूरकरांना कैद्यांकडून भेटवस्तू
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातल्या कैद्यांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या वस्तू सध्या बाजारपेठांमध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहेत. दिवे, पणत्या, आकाशकंदील आणि इतर भेटवस्तू घेण्यासाठी ग्राहकही गर्दी करतायत. कैद्यांना काहीतरी वेगळं कौशल्य आत्मसात करायला मिळतं आणि नागरिकांनाही अशा वस्तू बाजारभावापेक्षा कमी दरात मिळत आहेत.
दिवाळीत भेसळ: कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप!
दिवाळीसाठी फराळ करण्यासाठी खरेदी करताना राहा सावधान. दिवाळीच्या फराळात भेसळयुक्त पदार्थांची गर्दी आहे. कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप, गुलकंदात टीश्यू पेपरचे तुकडे अशा प्रकारची भेसळ होत आहे.
महिला बचत गटांचा `दिवाळी फराळ`
ज्या सणाची अनेक जण आतुरतेनं वाट पहात असतात तो सण म्हणजे दिवाळी.... अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेली दिवाळी आता कधी येतेय याचीच सर्वजण वाट पहात आहेत आणि दिवाळी म्हटलं की फराळ आलाच. सर्वच ठिकाणी हा फराळ बनवण्याची लगबग सुरु आहे. या संधीचा फायदा उठवण्यासाठी बचत गटही पुढे सरसावलेत...
मग, यंदा कशी साजरी कराल दिवाळी...
कित्येकदा आपल्याला ऐकायला मिळते, दिवाळी सणादिवशी असुरक्षित आणि चुकीच्या पद्धतीने फटाके जाळल्याने घरात किंवा काही ठिकाणी भयंकर आग लागते. या काळ्याकुट्ट घटना नक्कीचं टाळल्या जाऊ शकतात. जर माणसांना अनर्थ गोष्टी घडण्याआधीचं या सर्वांचे व्यवस्थित ज्ञान गेलं दिलं तरचं...
दिवाळीचं महत्व
दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दिवाळी या सणाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. आश्विरन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विदन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या(लक्ष्मीपूजन) व कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते.
भाऊबीजेचे महत्व
हा दिवस म्हणजे शरद ऋतुतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र (ज्योतिष) आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो`, ही त्यामागची भूमिका आहे.
रांगोळीच्या रंगांची शिकवण...
घराची, दाराची सजावट करण्यासाठी म्हणून रांगोळी रेखाटली जात नाही... तर घरापासून नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्यासाठी ही रांगोळी काढली जाते. वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात. त्यातून सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये समावून घेऊन त्याच पद्धतीनं विचार करण्याची शिकवण रांगोळीच्या माध्यमातून दिली जाते. आशावादी राहण्यातून घराची भरभराट होते असा समज आहे.